शिर्डी: महिलेवर 22 वर्षीय तरूणीकडून चाकूने 16 वेळा वार, पीडितेचा रूग्णालयात मृत्यू

मुंबई तक

Shirdi Crime : साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साई मंदिर परिसरात फळे विकणाऱ्या महिलेचा वाद झाला होता. याच वादानंतर 30 वर्षीय महिलेची चाकून भोसकून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं परिसर पूर्णपणे हादरून गेला, या प्रकरणी दोन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

Shirdi Crime
Shirdi Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

 महिलेवर 22 वर्षीय तरूणीकडून चाकूने 16 वेळा वार

point

पीडितेचा रूग्णालयात मृत्यू   

Shirdi Crime : साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साई मंदिर परिसरात फळे विकणाऱ्या महिलेचा वाद झाला होता. याच वादानंतर 30 वर्षीय महिलेची चाकून भोसकून हत्या करण्यात आली होती. या घटनेनं परिसर पूर्णपणे हादरून गेला होता. साई मंदिराच्या गेट क्रमांक 4 समोर रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. संबंधित प्रकरणी शिर्डी पोलिसांनी कारवाई करत दोन्ही महिलांना गजाआड टाकले. 

हे ही वाचा : तरुणी रथयात्रेतून किडनॅप, प्रियकरानं जंगलात नेऊन संपवलं

 महिलेवर 22 वर्षीय तरूणीकडून चाकूने 16 वेळा वार

घडलेल्या घटनेनुसार, आरोपी महिलांची ओळख युवती फिजा पटेल ( 22) व तिची मैत्रीण अंजली खंडिझोड अशी ओळख समोर आली. तर मृत महिलेची जयश्री क्षिरसागर (वय 30) अशी ओळख समोर आली. दरम्यान, फिजा पटेल या महिलेनं फळविक्रेत्या जयश्री क्षिरसागर यांच्यावर चाकूने तब्बल 16 वेळा सपासप वार केले. अशा परिस्थितीत जयश्री या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. या घटनेनं परिसर हदरून गेला आहे. 

पीडितेचा रूग्णालयात मृत्यू   

चाकूच्या या प्राणघातक हल्ल्यात जयश्री क्षीरसागर गंभीरपणे जखमी झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रींना तातडीने उपचारासाठी नजीकच्या साईबाबा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनं शिरडी शहर हादरून गेले आहे. 

हे ही वाचा : Jantar Mantar Protest: अभिनेते प्रकाश राज ज्या ट्रकवर चढले त्याच्या टायरची हवाच पोलिसाने काढली, प्रचंड गोंधळ

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध सुरू केला. या प्रकरणी आरोपी महिलांवर गुन्हा दाखल केला. आरोपी अंजली खडीजोड आणि फिजा पटेलच्या मुसक्या आवळल्या.   

हे वाचलं का?