“मविआ आंदोलनात आंतकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय”

मुंबई तक

Sadabhau Khot On Neet Protest : दिल्लीत जे आंदोलन सुरूये, ते आगीत तेल ओतण्याचं काम सुरू आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी देशात आंतकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करत आहे, असं सदाभाऊ खोत म्हणाले. सदाभाऊंच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.

ADVERTISEMENT

Sadabhau Khot On Neet Protest
Sadabhau Khot On Neet Protest
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दिल्लीत सुरू असलेलं आंदोलन आगीत तेल टाकतंय

point

“मविआ आंदोलनात आंतकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करतेय”

point

विजय वडेट्टीवार यांचा संताप

Sadabhau Khot On Neet Protest : दिल्लीत जे आंदोलन सुरूये, ते आगीत तेल ओतण्याचं काम सुरू आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी देशात आंतकवाद्यांसारखी परिस्थिती निर्माण करत आहे. केंद्रात नरेंद्रजी, तसेच महाराष्ट्रात देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी यांच्या खात्यात कसलाही बदल होणार नाही. कारण या आतंकवाद्यांना लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर द्यावं, कारण हा देश प्रगतीपथावर जात आहे, असं ते म्हणाले. खोत यांच्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत खोतांना चांगलं सुनावलं. 

हे ही वाचा : 'तुम्ही विद्यार्थ्यांची माफी मागा', लाठीचार्जवरुन राहुल गांधी पीएम मोदींवर भडकले

विजय वडेट्टीवार यांचं ट्विट जसंच्या तसं 

दिल्लीत सुरू असलेल्या या नीट पेपरफुटी आंदोलनात असंख्य विद्यार्थी सामिल झाले होते. याचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहे. अशातच सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांसह इंडिया आघाडीला आतंकवादी म्हटलं, त्यानंतर  NEET पेपरफुटीने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त केले, २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. याविरोधात न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची उपमा देताना सदाभाऊ खोत यांना लाज वाटायला हवी!

केवळ भाजपाच्या कृपेने आपल्याला फुकटची आमदारकी मिळाली म्हणून सदाभाऊ खोत भाजपाचे बटिक झाले आहेत. त्यांनी देशातील तरुणाईचा केलेला हा अवमान संतापजनक आहे! शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताना तुम्ही आतंकवादी होतात का? भाजपची पाप लपवण्यासाठी  तरुणांना आतंकवादी ठरविण्याचा अधिकार कोणी दिला?

हे ही वाचा : नीट पेपर फुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

दरम्यान, आता सीजेपीचे नेते अभिजीत दिपके यांच्या भेटीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत पोहोचले. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील जखमी आंदोलनाकांना भेटण्यासाठी गेले होते. 
 

हे वाचलं का?