आपल्या तरुणांकडे टॅलेंटची कमी नाही, 26 वर्षीय सिद्धार्थने 1 दिवसात कसे कमावले 77 कोटी?
सिद्धार्थने गूगल क्रोमसाठी एक अनोखे AI एक्सटेंशन तयार केले आहे. यामुळे तुम्ही ब्राउझरमध्येच AI फीचर्स जोडू शकता. चला जाणून घेऊया, Merlin नावाच्या या एक्सटेंशनने त्याला करोडपती कसं बनवलं.
ADVERTISEMENT

वॉशिंग्टन: वयाच्या 26 व्या वर्षी कोणी एका दिवसात 77 कोटी रुपये कमवू शकते का? हे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे वाटते, पण IIT कानपूरचा पदवीधर असलेल्या सिद्धार्थ सक्सेनाने हा दावा केला आहे. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI)आधारित स्टार्टअप्स चर्चेत आहे.
अलीकडील एका मुलाखतीनंतर, त्याची कहाणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याने खुलासा केला आहे की, त्याने एका दिवसात अंदाजे 8 मिलियन रुपये, म्हणजेच अंदाजे 77 कोटी रुपये कमावले आहेत.
नेमकं कोणतं टूल बनवलं की, ज्यामुळे मिळाले 77 कोटी?
सिद्धार्थ सक्सेनाने IIT कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याने मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले.
हे ही वाचा>> Govt Jobs : इस्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, काय आहेत निकष? जाणून घ्या सविस्तर
नंतर, त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत 'मर्लिन' (Merlin) नावाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप सुरू केला. हे एक AI-आधारित गुगल क्रोम एक्सटेंशन आहे, जे ईमेल लिहिणे, वेब पेजेसचा सारांश तयार करणे, कंटेंट तयार करणे आणि इतर अनेक कामांमध्ये मदत करते.










