Maharashtra Weather : वातावरण फिरलं, 'या' जिल्ह्यांना यलो तर ऑरेंज अलर्टचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात पावसाचा यलो अलर्टचा अधिक जिल्ह्यांत अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशातच 21 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात पुन्हा पावसाची हजेरी
यलो अलर्टचा अधिक जिल्ह्यांत अंदाज
Maharashtra Weather : काही दिवसांपासून राज्यात पाऊस गायब झाला होता, मात्र आता पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावणार आहे. राज्यात पावसाचा यलो अलर्टचा अधिक जिल्ह्यांत अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्टची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशातच 21 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज जाणून घेऊयात.
हे ही वाचा : शिर्डी: महिलेवर 22 वर्षीय तरूणीकडून चाकूने 16 वेळा वार, पीडितेचा रूग्णालयात मृत्यू
कोकण
कोकण विभागातील पालघर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवलेली आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड या तीन जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलाय. तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्ट आहे. अहिल्यानगरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.










