CJP वाले मंत्री महोदयांना ऑफिसमध्ये जाऊन भेटले, 'या' 3 गोष्टी सांगितल्या अन्...
Dharmendra Pradhan: दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP)केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेऊन तीन प्रमुख मागण्या मांडल्या. पक्षाने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या तात्काळ सुटकेची मागणीही केली.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP) सोमवारी (20 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले. पक्षाने या निवेदनात तीन प्रमुख मागण्या केल्या. पहिली मागणी सामाजिक कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांची रुग्णालयातून तात्काळ सुटका करण्याची होती.
नेमक्या काय केल्या मागण्या?
दुसरी मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची होती. तिसरी मागणी नीट-यूजी 2026 पेपरफुटीनंतर कथितरित्या आत्महत्या केलेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची होती.
हे ही वाचा>> CJP Protest: तब्बल साडेतीन तास बैठक, अमित शाहा घेणार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा?
सीजेपी पक्षाचे म्हणणे आहे की, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे आणि सरकारने त्यांना जबाबदार धरण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.
सरकारी प्रतिनिधी आणि आंदोलकांमध्ये झालेल्या बैठकीनंतर हे निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, चर्चेचा प्रस्ताव आंदोलकांकडून आला होता आणि सकाळी 11.50 पासून चर्चा सुरू होती. नड्डा म्हणाले, "बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.''










