'अराजकता तयार करण्याचा प्रयत्न...' दिल्लीतील आंदोलनाबद्दल फडणवीस काय म्हणाले?

मुंबई तक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या आंदोलनात राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल असा प्रयत्न करत आहेत. तर काहीजण अराजकता कशी तयार करता येईल असा प्रयत्न करत आहेत. फडणवीस नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis On CJP Protest
Devendra Fadnavis On CJP Protest
Google CTA

बातम्या हायलाइट

point

अराजकता तयार करण्याचा प्रयत्न...

point

दिल्लीतील आंदोलनाबद्दल फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis On CJP Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनात झालेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारवर चहुकडून टीकेची झोड उठलेली आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या आंदोलनात राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल असा प्रयत्न करत आहेत. तर काहीजण अराजकता कशी तयार करता येईल असा प्रयत्न करत आहेत. फडणवीस नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

'राजकीय पक्ष पोळी भाजत आहेत..'

फडणवीस म्हणाले की, 'ज्यावेळेस आंदोलन फेसलेस (नेतृत्त्वहीन) असतं, त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात. आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन, आंदोलनाच्या खांद्यावर बंदुक ठेवून आपले स्वार्थ आपल्याला कसे पूर्ण करता येईल असा प्रयत्न करत असतात. दिल्लीमध्येही जे आंदोलन झालं त्यात अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करत आहेत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी काही देणं-घेणं नाहीये, पण अराजकता कशी तयार करता येईल असा प्रयत्न करत आहेत.' 

हे ही वाचा : नीट पेपर फुटी प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

'आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार'

ते पुढं म्हणाले की, 'लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. लोकशाहीत आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतीपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सर्वांना अधिकार आहे. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता करण्याकरिता, विना परवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे हे कुठल्याही परिस्थितीत योग्य नाही. त्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल.'

हे ही वाचा : 'आमच्या शिष्टमंडळाला नजरकैद करण्यात आलं...' दिपकेंनी काय सांगितलं? आंदोलनाची पुढील दिशा काय?

'सरकारला लाठीचार्ज करणं आवडत नाही...'

फडणवीस म्हणाले की, 'आपण दिल्लीतही बघितलं की कशाप्रकारे नेतृत्त्वहीन व्यवस्था पहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल अशा अनेक गोष्टी घडल्या. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही पण काल ज्या प्रकारची अवस्था होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक घटना त्याठिकाणी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयमदेखील दाखवलेला आहे. अशा प्रकारचं आंदोलन योग्य पद्धतीने व्हावं यापुरती जेवढी कारवाई करायला हवी तेवढी कारवाई पोलिसांनी केलीये. याच्या खोलात गेलं तर मी काही सगळ्या आंदोलकांवर आरोप करु इच्छित नाही. काही लोक चांगल्या भावनेनंही करत असतील. पण हे निश्चित आहे की असे लोकही यात घुसलेले आहेत ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे. ज्यांना या नीटशी काही देणं-घेणं नाहीये, ज्यांना केवळ अराजकता तयार करायची आहे.' 
 

हे वाचलं का?