बस स्टँडवरुन अपहरण, नंतर सामूहिक बलात्कार, 30 वर्षीय महिलेसोबत काय घडलं?

मुंबई तक

एका 30 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकातील म्हैसूरमधील ही घटना आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बस स्टँडवरुन अपहरण

point

नंतर सामूहिक बलात्कार

point

30 वर्षीय महिलेसोबत काय घडलं?

Crime News : कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्ह्यातील टी. नरसीपुरा शहरात एका 30 वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला मूळची पश्चिम बंगालची असून ती उपजीविकेसाठी म्हैसूरमध्ये राहत होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

घरी जात असताना घडला अनर्थ

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आणि एफआयआरमधील माहितीनुसार, 18 जुलै रोजी ती तिच्या मनप्रीत नावाच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी म्हैसूर शहरात गेली होती. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास राहत्या घरातून निघालेली ही महिला पार्टी संपल्यानंतर रात्री साडेआठ वाजता मैत्रिणीला रेल्वे स्टेशनवर सोडून परत टी. नरसीपुरा येथे येण्यासाठी खाजगी बसमध्ये बसली. रात्री 9:45 च्या सुमारास ती टी. नरसीपुरा येथील खाजगी बस स्थानकावर पोहोचली. तेथून ती घराकडे पायी जात असताना एका राखाडी रंगाच्या (ग्रे) कारमधील ड्रायव्हरने तिच्याजवळ गाडी थांबवून एका कागदावरील पत्ता विचारण्याचे नाटक केले. पीडितेने आपल्याला कन्नड भाषा येत नसल्याचे सांगताच, कारच्या मागील सीटवर बसलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिला बळजबरीने ओढून कारमध्ये डांबले.

हे ही वाचा : मोदींना 'लेम डक' प्रेसिडेंटची उपमा, सरकारला म्हणाले मानसिक रुग्ण.. राज ठाकरेंची नवी फेसबुक पोस्ट पाहिली का?

लॉजवर नेऊन बलात्कार

कारमधील तिघांनी तिला गप्प बसण्याची धमकी दिली आणि ओरडल्यास बिअरच्या बाटलीने डोके फोडून मारून टाकण्याची भीती दाखवली. आरोपींनी तिला टी. नरसीपुरा येथील गुंजा नरसिम्हास्वामी मंदिर मार्गे मोगुरु गावाजवळ असलेल्या एका लॉजवर नेले. रात्री 11:30 च्या सुमारास लॉजच्या मागील दाराने तिला एका खोलीत नेण्यात आले. तिथे तिघांनी तिला जबर मारहाण करत आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. या अमानुष कृत्यानंतर आरोपींनी तिच्याकडे पैशांची मागणी केली आणि तिच्याजवळील 5,000 रुपयांची रोख रक्कम व दोन मोबाईल फोन लुटले.

'अशी' झाली सुटका

आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पीडितेने चलाखी दाखवत आपल्या घरी 1 लाख रुपये ठेवले असल्याचे सांगितले आणि ते पैसे देण्याचे आमिष दाखवून तिला घरी नेण्यास सांगितले. त्यानंतर मध्यरात्री 1:30 ते 2 च्या दरम्यान आरोपींनी तिला तिच्या राहत्या घराच्या परिसरात आणून सोडले. सुटका झाल्यानंतर पीडितेने लगेचच आपल्या घरमालकाचे घर गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला. घरमालकाच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ माहिती देण्यात आली.

हे वाचलं का?