'नवरा कामावर गेल्यावर सासरा माझ्यासोबत...' सुनेनं गाठलं पोलीस स्टेशन; काय घडलं?

मुंबई तक

एका विवाहितेवर सासऱ्यानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र यानंतर महिलेच्या नवऱ्याने वेगळाच दावा केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नवरा कामावर गेल्यावर सासरा माझ्यासोबत...

point

सुनेनं गाठलं पोलीस स्टेशन

point

काय घडलं?

Crime News : एका विवाहित महिलेने आपल्या सासऱ्यावर बंदुकीचा धाक दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर तिचा पती जेव्हा कामाच्या निमित्ताने घराबाहेर असायचा, तेव्हा सासऱ्याने तिच्या असहायतेचा फायदा घेतला. आरोपी सासऱ्याने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून तिला धमकावले आणि कोणालाही काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला. मूळची उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी असलेल्या या पीडितेचा विवाह 2023 मध्ये झाला होता. 

सासरच्या मंडळींकडून मारहाण

या अत्याचारानंतर पीडितेने जेव्हा याला कडाडून विरोध केला, तेव्हा तिला सासरच्या मंडळींकडून कोणतीही मदत मिळाली नाही, उलट तिच्यावरच अन्याय करण्यात आला. पीडितेने सांगितले की, 24 जानेवारी रोजी घडलेल्या ताज्या घटनेनंतर जेव्हा तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिच्या सासूने, नणंदेने आणि दिराने तिला वाचवण्याऐवजी तिला बेदम मारहाण केली. लग्नानंतर सासरच्या घरातून सातत्याने छळ होत असल्याचा आरोपही तिने पोलिसांत केला आहे. या संपूर्ण प्रकारात तिच्या नवऱ्याने जाणूनबुजून दुर्लक्ष केले, असा आरोप तिने केला आहे.

हे ही वाचा : गर्लफ्रेंडच्या नादात वेडा झाला, पोटच्या जुळ्या मुलींसह आणखी एका लेकीसोबत क्रूर कृत्य

नवऱ्याचा वेगळाच दावा

दुसरीकडे, पोलिसांच्या चौकशी दरम्यान पीडितेच्या नवऱ्याने या आरोपांवर वेगळाच दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि याच कारणामुळे त्यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून कौटुंबिक आणि वैवाहिक वाद सुरू होता. सध्या पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून घेतले असून सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, वाद विकोपाला गेल्यानंतर पीडिता आपल्या माहेरी परतली होती, जिथे तिच्या पतीने तिला फोनवरून 'तीन तलाक' दिल्याची माहिती समोर आली आहे. महिलेने हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर आणि मानसिक छळ करणारा असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा : विवाहित पुरुषाबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिप, शेवटी भयंकर घडलं!

सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारीच्या आधारे पीडितेचा पती, सासरा, सासू, दीर आणि नणंद यांच्याविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायद्याच्या तरतुदींचा समावेश आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले असल्याने पोलीस सर्व अंगांनी तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, भारतात 2019 मध्ये 'तीन तलाक' बेकायदेशीर घोषित करण्यात आला असून, तत्काळ तीन तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची तरतूद कायद्यात आहे.

हे वाचलं का?