विवाहित पुरुषाबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिप, शेवटी भयंकर घडलं!

मुंबई तक

Crime News : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मानसी नावाच्या तरुणीने आपल्या विवाहित जोडीदाराच्या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित पुरुषाबरोबर लिव्ह-इन-रिलेशनशिप

point

शेवटी भयंकर घडलं!

Crime News : एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मानसी असे मृत तरुणीचे नाव असून, ती गेल्या पाच-सहा वर्षांपासून प्रभात सक्सेना नावाच्या एका विवाहित पुरुषासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. सोमवारी दुपारी मानसी थेट पोलीस ठाण्यातील 'मिशन शक्ती' केंद्रात पोहोचली आणि तिने पोलीस कर्मचाऱ्यांना आपण विष प्राशन केल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच पोलीस दलात खळबळ उडाली आणि तिला तात्काळ उपचारांसाठी साई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे बादलीत भरुन ठेवले, पोटचीच मुलं का झाली निष्ठुर?

 नैराश्यातून मानसीने उचलले टोकाचे पाऊल

मृत मानसीचे वडील छोटे लाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी काही वर्षांपूर्वी प्रभात सक्सेनासोबत राहायला गेली होती. प्रभात आधीच विवाहित असून त्याला मुलेही आहेत, तरीही त्याने मानसीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिला फसवले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मानसी जेव्हा प्रभातवर लग्नासाठी दबाव टाकत असे, तेव्हा तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असे. प्रभातच्या याच छळाला कंटाळून आणि त्याच्या विश्वासघातामुळे नैराश्यातून मानसीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून प्रभात सक्सेनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : बीड : ‘तू काळी अन् पांढऱ्या पायाची आहेस..’, विवाहितेचा अनन्वित छळ करुन हत्या

हे वाचलं का?