बीड : ‘तू काळी अन् पांढऱ्या पायाची आहेस..’, विवाहितेचा अनन्वित छळ करुन हत्या

मुंबई तक

Beed Crime News : "बीड: तू काळी.. पांढऱ्या पायाची आहेस..", सतत मानसिक छळ करून डोक्यात धारदार शस्त्राने वार करत विवाहितेची सासरच्या मंडळींकडून हत्या

ADVERTISEMENT

Beed Crime News
Beed Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीड : ‘तू काळी अन् पांढऱ्या पायाची आहेस..’

point

विवाहितेचा अनन्वित छळ करुन हत्या

Beed Crime News, योगेश काशिद, बीड : बीडच्या कुटेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत 23 वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. विवाहितेच्या डोक्यात गंभीर जखम दिसून आली. यात पोलिसांनी केलेल्या तपासात सासरच्यांनीच महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचं समोर आलं. याप्रकरणी मृतविवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : सैराटपेक्षाही भयंकर, पायात खिळे ठोकल्याचा आरोप; केवळ मुलीशी मैत्री केल्याने हत्या

लग्नात चार लाख रुपये हुंडा आणि एक तोळा सोने

संध्या किसन घुले हिचा 20 मे 2022 रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी विवाह झाला होता. लग्नात चार लाख रुपये हुंडा आणि एक तोळा सोने देऊनही लग्नानंतर काही दिवसातच सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केला. "तू काळी आहेस.. स्वयंपाक येत नाही.. पांढऱ्या पायाची आहेस", असे म्हणत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सासरच्यांनी सुरू ठेवला. तर माहेराहून ऑटो रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिला तीन महिने माहेरी आली होती. परंतु दीड वर्षांच्या मुलासाठी समजूत काढून संध्याला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. 

हेही वाचा : वसतीगृह चालकाची बायको परपुरुषासोबत दिसली, विद्यार्थी आवाज करणार इतक्यात..