वसतीगृह चालकाची बायको परपुरुषासोबत दिसली, विद्यार्थी आवाज करणार इतक्यात..
Crime News : एका सहा वर्षांच्या मुलाने अनैतिक संबंध पाहिल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर ती घटना आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वसतिगृह चालकाची बायको परपुरुषासोबत दिसली,
विद्यार्थी आवाज करणार इतक्यात..
Crime News : एका शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या सहा वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर बालक हे युकेजी (UKG) वर्गात शिकत होते आणि गेल्या सहा महिन्यांपासून शाळेच्या वसतिगृहातच राहत होते. 7 जून रोजी या बालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तपास सुरू केला. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हत्येमागील कारण उघड झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात धो धो पाऊस कोसळणार, 'या' 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
अनैतिक संबंधांमधून विद्यार्थ्याची हत्या
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही हत्या अनैतिक संबंधांमधून झाली आहे. वसतिगृह चालकाची पत्नी अंजली कुमारी आणि अंकित कुमार यांच्यात अनैतिक संबंध होते. 6 जूनच्या रात्री या बालकाने त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि तो घाबरून ओरडू लागला. आपली बदनामी होईल या भीतीने अंजली कुमारी हिच्या सांगण्यावरून आरोपी अंकित कुमारने मुलाचे तोंड आणि नाक जोरात दाबले, ज्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूर मार्गांचा अवलंब केला आणि ही हत्या आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : Personal Finance: 'हे' कागद नसतील तर अजिबात खरेदी करू नका तशी शेतजमीन!









