Maharashtra Weather : राज्यात धो धो पाऊस कोसळणार, 'या' 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अद्यापही काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम असताना दिसून येतो. अशातच 11 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात धो धो पाऊस कोसळणार

point

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अद्यापही काही ठिकाणी उन्हाचा चटका कायम असताना दिसून येतो. अशातच कोकण विभागात 1, पश्चिम महाराष्ट्र 2, मराठवाडा 2 आणि विदर्भातील 10 अशा एकूण 15 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. अशातच 11 जून 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : रत्नागिरी: 3 भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले.. नदीत बुडून दुर्दैवी अंत

कोकण 

कोकण विभागात पालघर जिल्ह्याला उष्णतेचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दिवसभर उष्णता राहणार असून सायंकाळी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज देण्यात आला. याच भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. याच भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.