रत्नागिरी: 3 भावांवर काळाचा घाला, पोहायला गेले.. नदीत बुडून दुर्दैवी अंत

मुंबई तक

Ratnagiri news : रत्नागिरीच्या खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. सुट्टीसाठी नातेवाईकांकडे आलेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

Ratnagiri News
Ratnagiri News
google news

बातम्या हायलाइट

point

नदीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

point

मृत तरुणांची नावे आली समोर 

Ratnagiri News : गोकुळ कांबळे - रत्नागिरीच्या खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. सुट्टीसाठी नातेवाईकांकडे आलेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

हे ही वाचा : मित्रानेच 22 वर्षीय तरुणाचे न्यूड फोटो-व्हिडिओ केले रेकॉर्ड, विष पिऊन...

मृत तरुणांची नावे आली समोर 

मृतांची आकाश कांबळे, नरेश कांबळे आणि कैलास कांबळे अशी ओळख समोर आली आहे. हे तिघेजण मूळचे सांगली जिल्ह्यातील असून अनेक वर्षांपासून मुंबईतील कुर्ला येथे राहत होते. उन्हाळ्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ते रत्नागिरीतील खेड येथे आपल्या नातेवाईकांसोबत नदीत पोहण्यासाठी गेले असता, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला.

नदीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. पोलिसांनी रेस्कू पथकाच्या मदतीने परिस्थिती हाताळली. बचावकार्यादरम्यान एका तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र आकाश, नरेश आणि कैलास यांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. यामुळे पाण्यात बुडून तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. संबंधित घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेनं खेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.  

हे ही वाचा : मशिदीत 14 वर्षीय मुलीवर नको तेच.. लाज आणणारा प्रकार

उन्हाळ्यात अशा वारंवार घटना घडताना दिसून येत आहेत. स्थानिक प्रशासन किंवा नदी तसेच पाण्याच्या भोवतालच्या परिसरात जाण्यास प्रशासनाने निर्बंध लादावे, जणेकरून अशा घटना घडणार नाहीत. 

हे वाचलं का?