मशिदीत 14 वर्षीय मुलीवर नको तेच.. लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

Crime News : एका मशिदीत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीची ओळख इमाम झाकीर हुसैन अशी आहे. दरम्यान पोलिसांनी चकमकीत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलं आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मुलगी मशिदीत उर्दू शिकायला गेली

point

मशिदीत 14 वर्षीय पीडितेवर लैंगिक अत्याचार

Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका मशिदीत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीची ओळख इमाम झाकीर हुसैन अशी आहे. दरम्यान पोलिसांच्या चकमकीत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पीडित मुलगी सोमवारी दुपारी उर्दू शिकण्यासाठी गेली असता, रामगढ मशिदीत हा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला.  

हे ही वाचा : वडील गाढ झोपले, अल्पवयीन लेकानं कुऱ्हाडीनं गळा चिरल्याचा संशय

पोलिसांच्या माहितीनुसार, आपण कोंडीत सापडलो आहोत हे पाहून त्याने पिस्तुलने पथकावर गोळीबार केला. मात्र प्रत्युत्तर म्हणून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला असता, त्याच्या पायाला गोळी लागली, ज्यात तो जखमी झाला. त्याला एका शासकीय ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.  

मशिदीत 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

घडलेल्या घटनेनुसार, ही घटना दुपारी दीड वाजता रामगढ येथील जन्नती मशिदीत घडल्याचे वृत्त आहे. रामगढची 14 वर्षीय मुलगी तिथे उर्दू शिकायला जायची. नातेवाईकांच्या माहितीनुसार, इतर मुलं निघून गेल्यानंतर इमाम झाकीरने तिच्याकडे पाण्याची मागणी केली. ती पाणी आणायला जाताच, त्याने तिला आपल्या खोलीत ओढून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

हे ही वाचा : सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं, हत्या लपण्यासाठी..

पीडितेनं कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली आणि नंतर रडत रडत घराबाहेर आली, तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, जेव्हा पीडिता घरी गेला असता, तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्याचक्षणी नातेवाईक आणि शेजारचे मंडळी मशि‍दीकडे धावून आले होते. दरम्यान आईने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. 

हे वाचलं का?