सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं, हत्या लपण्यासाठी..

मुंबई तक

crime news : आईनेच सात महिन्यांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस तपासातून उघड झाले की, आईने केवळ मुलीचीच हत्या केली नाही, तर पती, मुलगा आणि सासरच्या मंडळींना संपवण्याचा कट देखील रचला होता.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं 

point

सासरच्यांना विष देऊन मारण्याचा प्लान

Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठच्या मुंडाली भागात आईनेच सात महिन्यांच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलीस तपासातून उघड झाले की, आईने केवळ मुलीचीच हत्या केली नाही, तर पती, मुलगा आणि सासरच्या मंडळींना संपवण्याचा कट देखील रचला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, प्रकरणाचा तपास सुरू केला. 

हे ही वाचा : डील गाढ झोपले, अल्पवयीन लेकानं कुऱ्हाडीनं गळा चिरल्याचा संशय

सात महिन्यांच्या बाळाला आईनं गळा दाबून संपवलं 

मुरलीपूर गावातील रहिवासी अमित तोमर यांनी आपल्या सात महिन्यांच्या रुद्रांश या चिमुकल्याच्या हत्येचा आरोप पत्नी मीनाक्षीवर आहे. पोलिसांत तक्रार दाखल करून नंतर मीनाक्षीला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यांनुसार, मीनाक्षीने आपल्या मुलाचा गळा दाबून तिचा खून केला आणि नंतर तो आजारपणामुळे मृत पावल्याचा दावा केल्याची कबुली दिली. 

सासरच्यांना विष देऊन मारण्याचा प्लान

संबंधित चौकशीतून एक खळबळजनक खुलासा करण्यास आला की, हा खुनाचा कट इथेच थांबणारा नव्हता. मिनाक्षी आणि तिच्या प्रियकराने दुसऱ्या मुलाची आणि अमितसह सासरच्या इतर सर्वांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. ते सर्वांना विष देऊन मारण्याचा प्लान करत होते. 

पोलिसांनी मिनाक्षी आणि तिचा प्रियकर मोहित यांच्या विरोधात खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी रुद्रांशचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात पत्र लिहून पाठवले. बुधवारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

हे वाचलं का?