वडील गाढ झोपले, अल्पवयीन लेकानं कुऱ्हाडीनं गळा चिरल्याचा संशय
Crime News : लेकानेच गाढ झोपलेल्या वडिलांचा कुऱ्हाडीने हल्ला करून गळा चिरल्याचा धक्कादायक संशय व्यक्त करण्यात आला, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा घरात मुलगा आणि वडीलच होते. पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अल्पवयीन मुलाचा वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा संशय
मृत्यूचं ठोस कारण नाही
Crime News : राजस्थानातील अलवर शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लेकानेच गाढ झोपलेल्या वडिलांचा कुऱ्हाडीने हल्ला करून गळा चिरल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला. हा धक्कादायक प्रकार अलवर शहरातील डुंगरी परिसरानजीकच्या रामकृपाल नगर परिसरात घडला. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे.
हे ही वाचा : जालना : वडिलांच्या मित्राकडून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 'नको तेच', चार महिन्यांपूर्वी..
घडलेल्या घटनेनुसार, रोहिताश्व कुमार हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. ई- रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. ज्या दिवशी हा धक्कादायक प्रकार घडला तेव्हा घरात लेक आणि वडील हे दोघेच होते. बायको आणि आई ही लग्नासाठी गेली होती, अशातच घरात इतर तिसरी व्यक्ती कोणीच नव्हतं.
अल्पवयीन मुलाचा वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला
सांगण्यात येतंय की, वडील रोहिताश्व कुमार हे घरी एकटेच झोपले होते. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने आपल्या वडिलांवर हल्ला केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीवर एक दोन नाहीतर तब्बल सहा वेळा कुऱ्हाडीने हल्ला केला. याच हल्ल्यात रोहिताश्वचा मृत्यू झाला. घटनास्थळावर कुऱ्हाड आढळून आली होती.
हत्येचं ठोस कारण अद्यापही समोर नाही
या प्रकरणात पोलिसांच्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने वडिलांच्या हत्येची कोणीतीगी माहिती दिला नाही. प्राथमिक चौकशीतून देखील या हत्येचं ठोस कारण समोर आले नाही. मृत व्यक्तीच्या मेहुण्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली, नंतर पोलिसांनी कारवाई केली. अरावली विहार पोलीस घटनास्थळी धावले. पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि आरोपी किशोरला ताब्यात घेतलं.









