IT इंजिनीअरने केला 150 कोटींचा सायबर फ्रॉड, न्यायालायात जामीन मंजूर; देशभर कसं पसरवलं जाळं?

देशातील नागरिकांचे 150 कोटी रुपये लुटणाऱ्या आयटी इंजिनीअरला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र त्याने हा घोटाळा नेमका कसा केला? जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

150 Crore Cyber Fraud
150 Crore Cyber Fraud
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

150 कोटींचा सायबर फ्रॉड

point

आरोपीला जामीन मंजूर

Mumbai Cyber Fraud : मुंबईच्या एस्प्लेनेड दंडाधिकारी न्यायालयाने तब्बल 150 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इंदोर येथील 36 वर्षीय सॉफ्टवेअर डेव्हलपर पंकज अवधेश लाल गुप्ता याला जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पंकज गुप्ता याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (DCB CID) प्रॉपर्टी सेलने अटक केली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले होते की, आरोपीने सायबर गुन्हेगारांना लोकांना गंडवण्यासाठी लागणाऱ्या हजारो धोकादायक एपीके (APK) फाइल्स तयार करून विकल्या होत्या.

देशभरातली नागरिक अडकले जाळ्यात

पोलिसांच्या तपास अहवालानुसार, आरोपी पंकज गुप्ताने देशभरातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी तब्बल 2,805 मालवेअरयुक्त अँड्रॉइड पॅकेज किट (APK) फाइल्स तयार केल्या होत्या. या बनावट फाइल्सचा वापर करून विविध सायबर गुन्हेगार नेटवर्कने देशभरातील सामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवले आणि त्यांची आर्थिक लूट केली. या धोकादायक फाइल्सच्या माध्यमातून देशभरात अक्षरशः सायबर गुन्ह्यांचे जाळे पसरवण्यात आले होते.

हे ही वाचा : आमदार निवासस्थानात धक्कादायक प्रकार, काँग्रेस आमदाराच्या खोलीत तरुण अन् तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत

150 कोची रुपयांची लूट

तपासादरम्यान असे समोर आले की, या संपूर्ण सायबर फसवणुकीच्या रॅकेटमधून गुन्हेगारांनी तब्बल 150 कोटी रुपयांची माया जमवली असून, या महाघोटाळ्यात देशभरातील 9 हजार 600 हून अधिक नागरिक या फ्रॉडची शिकार झाले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी पंकज गुप्ता या धोकादायक एपीके फाइल्स प्रत्यक्षात सक्रिय असणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या मॉड्यूल्सना विकत असे आणि प्रत्येक एपीके फाइलमागे तब्बल 20 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंतची घसघशीत रक्कम वसूल करत असे.

हे ही वाचा : Govt Jobs : भारतीय रेल्वेत तब्बल 4651 जागांसाठी मेगा भरती, लगेच करा अर्ज

रॅकेटचा म्होरक्या कोण?

याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या, मात्र आता एस्प्लेनेड दंडाधिकारी न्यायालयाने त्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत जामीन मंजूर केला आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये अजून कोणाकोणाचा सहभाग आहे आणि या बनावट ॲप्समागील इतर म्होरके कोण आहेत, याचा सखोल शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून अद्यापही अधिक तपास केला जात आहे.