आमदार निवासस्थानात धक्कादायक प्रकार, काँग्रेस आमदाराच्या खोलीत तरुण अन् तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत

भोपाळमधील आमदारांच्या विश्रामगृहात एक धक्कादायक प्रकार घडला. काँग्रेस आमदाराने याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

ADVERTISEMENT

MLA Rest House Controversy
MLA Rest House Controversy
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

आमदार विश्रामगृहात काय घडलं?

point

काँग्रेस आमदाराची कठोर कारवाईची मागणी

MLA Rest House News : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील आमदारांच्या विश्रामगृहातील (MLA Rest House) सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महिदपूरचे काँग्रेस आमदार दिनेश जैन बोस यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यासाठी राखीव असलेल्या खोलीत एक तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले. आमदार अचानक आल्यामुळे दोघेही तिथून पळून गेले. या घटनेनंतर आमदारांनी विधानसभा सचिवालयाकडे तक्रार करून सखोल चौकशीची आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

2 नोव्हेंबरला काय घडलं?

ही घटना आमदार विश्रामगृहाच्या ब्लॉक-3 मध्ये घडली आहे. आमदार दिनेश जैन बोस यांनी दिलेल्या माहितीनुसार,22 नोव्हेंबर रोजी दिल्लीहून परतल्यानंतर ते दुपारी 2 वाजता विश्रामगृहात पोहोचले. तिथे त्यांना खोली क्रमांक 14-15 देण्यात आली आहे. विश्रामगृहात पोहोचल्यावर त्यांनी केअरटेकरकडे खोली क्रमांक 15 ची किल्ली मागितली, परंतु ती उपलब्ध नव्हती. त्यानंतर त्यांना खोली क्रमांक 14 ची किल्ली देण्यात आली.

हे ही वाचा : 'माझ्या मृत्यूला व्यवस्था आणि भूमाफिया जबाबदार...' महिला आदिवासी नेत्याच्या मृत्यूने खळबळ

तरुण जोडपं आक्षेपार्ह अवस्थेत

आमदारांचा आरोप आहे की, ते खोली क्रमांक 14 मध्ये पोहोचले असता, शेजारील खोली क्रमांक 15 मध्ये एक तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे त्यांना दिसले. आमदारांना पाहताच दोघेही तिथून पळून गेले. आपल्या खोलीत चाललेला हा प्रकार बघून आमदार थक्क झाले. आमदारांच्या मते, त्यांच्या खोलीची किल्ली रिसेप्शन काउंटरवर ठेवली जाते. मात्र, त्यांची किंवा त्यांच्या पीएची (PA) परवानगी न घेताच केअरटेकरने इतरांना खोलीची किल्ली दिली.

हे ही वाचा : मुंबई : मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलांचे 20 हजारांहून अधिक आक्षेपार्ह फोटो अन् व्हिडीओ, 49 वर्षीय व्यक्तीला अटक

विधानसभा सचिवालयाला पत्र

या गंभीर प्रकरणाची दखल घेत आमदार दिनेश जैन बोस यांनी विधानसभा सचिवालयाचे प्रमुख सचिव यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. विधानसभेचे जनसंपर्क अधिकारी (PRO) महावीर सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, सध्या लोक निर्माण विभाग (PWD) या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. व्हीआयपी विश्रामगृहासारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.