कल्याणमध्ये घटनेचा थरार, दुचाकीतून पेट्रोलची गळती; फटाक्याच्या ठिणगीनं घेतला पेट
Kalyan News : दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना कल्याण पूर्व विभागात थरारक प्रकार उघडकीस आला. दुचाकीतून पेट्रोल गळती होताना फटाक्याची ठिणगी पडली आणि क्षणात होत्याचं नव्हतं होऊन बसलं. संबंधित दुचाकीस्वाराला आग लागून तरुण आगीने होरपळून निघाला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पेट्रोल गळती झाल्याने फटाक्याची ठिकणी पडल्याने दुचाकीस्वार भाजला
आगीत 20 टक्के भाजला तरुण
Kalyan News : दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांची आतिषबाजी सुरू असताना कल्याण पूर्व विभागात थरारक प्रकार उघडकीस आला. दुचाकीतून पेट्रोल गळती होताना फटाक्याची ठिणगी पडली आणि क्षणात होत्याचं नव्हतं होऊन बसलं. संबंधित दुचाकीस्वाराला आग लागून तरुण आगीने होरपळून निघाला होता. अशातच तरुण जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावत सुटला होता. मात्र, प्रसंगावधान राखून नागरिकांनी त्याते पेटलेले कपडे काढून प्राण वाचवले. घटनेचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा : Astrology : पुढच्या दिवाळीपर्यंत तुमचे आर्थिक भविष्य काय असेल? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य
पेट्रोल गळती झाल्याने फटाक्याची ठिकणी पडल्याने दुचाकीस्वार भाजला
ही दुर्दैवी घटना कल्याण पूर्व भागातील साईराज कॉलनी परिसरातील एफ केबिन भागातील आहे. आगीत होरपळून निघालेल्या तरुणाची सचिन सिंह अशी ओळख समोर आली होती. दुचाकीतून पेट्रोल गळती होताना त्याने आपली गाडी थांबवली आणि त्याने नेमके कुठून पेट्रोलची गळती होतेय हे तपासले. त्यानंतर त्याने पेट्रोलची गळती थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फटाक्याची ठिकणी पडल्याने आग लागली.
आगीत 20 टक्के भाजला तरुण
तरुण आगीत होरपळून निघाला होता, आपला जीव वाचवण्यासाठी तो रस्त्यावर भाजलेल्या अवस्थेत धावू लागला होता. परिस्थिती पाहून घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी धाव घेतली आणि आगीत होरपळत असलेल्या तरुणाच्या अंगावरील पेट अटोक्यात आणला होता. या दुर्दैवी घटनेत सचिन सिंह हा 20 टक्के भाजून निघाला होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
हे ही वाचा : Maharashtra weather : ऐन दिवाळीत वातावरण बदललं, मंगळवारसाठी IMD ची नवी अपडेट
संबंधित प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली होती.
