"पीएम मोदींच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा प्रयत्न होता", शिदेंंचे राहुल गांधींवर सनसनाटी आरोप

मुंबई तक

Eknath Shinde on Rahul Gandhi : "पीएम मोदींच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता", असा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलाय.

ADVERTISEMENT

Eknath Shinde on Rahul Gandhi
Eknath Shinde on Rahul Gandhi
Google CTA

बातम्या हायलाइट

point

"पीएम मोदींच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता"

point

शिदेंंचे राहुल गांधींवर सनसनाटी आरोप

Eknath Shinde on Rahul Gandhi : "प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलेही आंदोलन करता येत नाही. ही माहिती या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तिथं आंदोलन केलं गेलं. हजारो लाखो लोकांना तिकडे बोलावणं याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानांमध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचा हेतू होता. ते नेहमी बांगलादेश होणार म्हणतात. नेपाळ होणार म्हणतात. देशामध्ये अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता", असा सनसनाटी आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

हेही वाचा : Gen Z आंदोलन: ज्येष्ठ संपादक राजदीप सरदेसाईंनी सांगितल्या 'त्या' 5 मोठ्या गोष्टी, ज्यांनी बदलली देशाच्या राजकारणाची दिशा!

"पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करणे निंदनीय"

एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करणे हे निंदनीय आहे.  यापूर्वी देखील आपण दोन देशाचे प्रधानमंत्री गमावलेले आहेत. आणि म्हणून याचा मी अतिशय कठोर शब्दात निषेध करतो. कारण ते विरोधी पक्ष नेते असताना ते स्वतः सगळ्यांना आव्हान करत होते. इकडे आंदोलनाला या इकडे आंदोलनाला... या अरे आंदोलन तर जंतरमंतरवर होतं. मग तिकडे आंदोलन करण्यामागचा त्यांचा दृष्ट हेतू होता.  ही फार गांभीर्याने घेण्याची बाब आहे. 

हेही वाचा : नीटमध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, अहिल्यानगरातील घटना; सर्वत्र हळहळ