सोलापूर : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्यावर पहारेने वार, मृतदेह फेकला कालव्यात; न्यायालयाचा मोठा निर्णय

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याचा बायको आणि प्रियकराने खून केला. याप्रकरणी न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.

ADVERTISEMENT

Solapur Crime
Solapur Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रेमसंबंधांना विरोध

point

बायकोने नवऱ्याला संपवले

point

नेमकी घटना काय?

Solapur Crime : अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा डोक्यात लोखंडी पहारीने वार करून खून केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश राधिका शिंदे यांनी हा ऐतिहासिक निकाल दिला आहे. रंजना दादासाहेब पवार (32, रा. हिवरे, ता. मोहोळ) आणि अमोल ऊर्फ कृष्णा अंगद पांढरे (23, रा. कोन्हेरी, ता. मोहोळ) अशी शिक्षा सुनावलेल्या दोषींची नावे आहेत.

प्रेमसंबंधाना विरोध

मयत दादासाहेब हनुमंत पवार (36) हा त्याची पत्नी रंजना आणि अमोल यांच्या प्रेमसंबंधांना सतत विरोध करत होता. त्यामुळे या दोघांनी मिळून 26 एप्रिल 2023 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला होता. मयताचे काका गोविंद पवार यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात पुतण्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा छडा लागला.

हे ही वाचा : राणा जगजितसिंह पाटील यांची शरद पवारांशी भेट, सुनेत्रा पवारांच्या पाठीशी माहेरचे कुटुंब उभे?

आरोपी अमोलने दिली कबुली

पोलिसांनी मुख्य आरोपी अमोल पांढरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अँड. प्रदीपसिंह राजपूत यांनी मुख्य बाजू मांडली. न्यायालयाने खटल्यादरम्यान एकूण 25 साक्षीदार तपासले. यामध्ये सीसीटीव्ही फुटेज, आरोपीचा कबुली जबाब, वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरले.

हे ही वाचा : चर्चगेट विरार फास्ट लोकलमध्ये तुफान हाणामारी, चालत्या लोकलमधून प्रवासी फेकला

जन्मठेपेची शिक्षा

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पत्नी रंजना पवार आणि तिचा प्रियकर अमोल पांढरे या दोघांनाही हत्येप्रकरणी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाला इतर वकिलांचेही मोलाचे सहकार्य लाभले.