Personal Finance: 'हे' कागद नसतील तर अजिबात खरेदी करू नका तशी शेतजमीन!

रोहित गोळे

Agricultural Land Documents: शेतजमीन खरेदी करताना 10 कागदपत्रं अत्यंत महत्त्वाची असतात. त्यामुळे तशी कागदपत्रं उपलब्ध नसतील तर तशा जमिनींबाबत व्यवहार करू नका.

ADVERTISEMENT

personal finance do not buy agricultural land at all if these 10 documents are missing
Personal Finance
google news

Personal Finance tips for Agricultural Land Documents: आजकाल शेतीसाठी, गुंतवणुकीसाठी किंवा भविष्यातील विकासाच्या दृष्टीने अनेकजण शेतजमीन खरेदी करण्याकडे वळत आहेत. मात्र शेतजमीन खरेदी करताना केवळ किंमत आणि स्थान पाहणे पुरेसे नसते. जमिनीची मालकी, कायदेशीर स्थिती, सरकारी नोंदी आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे अत्यंत गरजेचे असते. योग्य पडताळणी न केल्यास फसवणूक, वादग्रस्त मालमत्ता किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

1. सातबारा उतारा (7/12 Extract)

शेतजमिनीशी संबंधित सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा. या दस्तऐवजात जमिनीचा सर्व्हे नंबर, क्षेत्रफळ, मालकाचे नाव, पीकपाणी माहिती, कर्जाचा बोजा किंवा इतर नोंदी नमूद असतात.

काय तपासावे?

*मालकाचे नाव विक्रेत्याच्या नावाशी जुळते का?
*जमिनीवर बँकेचे कर्ज किंवा बोजा आहे का?
*जमीन वादग्रस्त असल्याची नोंद आहे का?

हे वाचलं का?