सैराटपेक्षाही भयंकर, पायात खिळे ठोकल्याचा आरोप; केवळ मुलीशी मैत्री केल्याने हत्या
Crime News : एका 18 वर्षीय विद्यार्थ्याची मुलीशी मैत्री असल्याच्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या वडिलांनी जातीय अहंकारातून हे कृत्य केलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सैराटपेक्षाही भयंकर, पायात खिळे ठोकल्याचा आरोप
केवळ मुलीशी मैत्री केल्याने हत्या
Crime News : एका 18 वर्षीय विद्यार्थ्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केतन लाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो 12 वीच्या वर्गात शिकत होता. केतनची एका मुलीशी गेल्या सहा महिन्यांपासून मैत्री होती, जी मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती. याच रागातून मुलीच्या वडिलांनी आणि आजोबांनी केतन आणि त्याच्या मित्राला रविवारी रात्री घरी बोलावून त्यांना ओलीस ठेवले आणि रात्रभर अमानुष मारहाण केली. जातीय अहंकारामुळे हा प्रकार घडलाय. या मारहाणीत केतनच्या पायांत खिळे ठोकल्याचा गंभीर आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे, ज्यामुळे या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा : भाजपशी लढायचे असेल तर विरोधी पक्षांकडे आता हा 'एकच' पर्याय
उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला
केतनचे वडील, जे व्यवसायाने शेतकरी आहेत, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मुलीच्या वडिलांनी, यशबीर सिंग पवार याने त्यांना फोन करून धमकीच्या सुरात केतनबद्दल विचारणा केली. केतन घरी नसल्याचे समजताच यशबीरने केतन आणि त्याच्या मित्राची हत्या केल्याची कबुली दिली. केतनचे वडील तात्काळ यशबीरच्या गावी पोहोचले, तिथे त्यांना केतन आणि त्याचा मित्र दिवाकर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत आढळले. केतनला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मरण पावण्यापूर्वी केतनने आपल्या वडिलांना मुलीनेच आपल्याला घरी बोलावले होते आणि तिथे गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला डांबून मारहाण केल्याचे सांगितले.
हेही वाचा : ढीगभर पगार असूनही पैसा पुरेना! सांगलीतील अधिकाऱ्याने काय केले?









