कोचिंग क्लासवरून घरी परतण्यासाठी दिली लिफ्ट, स्कॉर्पिओत लैंगिक अत्याचार

crime news : कोचिंग क्लासवरून घरी परतण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कॉर्पिओ गाडीत लैंगिक अत्याचार केला. पीडित विद्यार्थिनी ही लिफ्टसाठी थांबली असताना तिच्यासोबत लज्जास्पद प्रकार घडला. आरोपीने कुटुंबीयांना फोन करण्याचे नाटक करून विद्यार्थिनीचा विश्वास संपादन केला आणि तिला घरी सोडवण्याऐवजी एका निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने स्कॉर्पिओत लैंगिक अत्याचार 

point

कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार 

Crime News : कोचिंग क्लासवरून घरी परतण्यासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर स्कॉर्पिओ गाडीत लैंगिक अत्याचार केला. पीडित विद्यार्थिनी ही लिफ्टसाठी थांबली असताना तिच्यासोबत लज्जास्पद प्रकार घडला. आरोपीने कुटुंबीयांना फोन करण्याचे नाटक करून विद्यार्थिनीचा विश्वास संपादन केला आणि तिला घरी सोडवण्याऐवजी एका निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासांत आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी या घटनेत वापरलेली स्कॉर्पिओ गाडीही जप्त करण्यात आली. 

हे ही वाचा : पत्नीचे अफेयर अन् सासूचा लेकीला पाठिंबा, संशयातून जावयाचा महिलेवर गोळीबार

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने स्कॉर्पिओत लैंगिक अत्याचार 

विद्यार्थिनीचा कोचिंग क्लास संपला होता. ती घरी जाण्यासाठी परतली होती, त्याचदरम्यान शहरातील जाखराज भागातील रहिवासी स्कॉर्पिओ गाडीतून येत होता. आरोपीने पीडितेला घराच्या वाटेवर असलेल्या लखीसराईचा पत्ता विचारला. त्याने तिला घरी सोडवतो असे सांगितलं. तेव्हा विद्यार्थिनीने नकार दिला, त्यानंतर आरोपीने त्याच्या मोबाईल फोनवरून तिच्या कुटुंबीयांना फोन केला आणि तिला सुरक्षितपणे पोहोचण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. 

कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार 

या घटनेदरम्यान क्रूर अत्याचाराची बळी ठरलेली तरुणी रात्री कशीबशी घरी पोहोचली आणि रडत रडत तिने आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी पीडितेला तात्काळ महिला पोलीस ठाण्यात नेले, जिथे एफआरआय दाखल करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ विशेष तपास पथक स्थापन केले आणि संभाव्य लपवण्याच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा : "मी गेल्यानंतर दुसरं लग्न कर", इंजिनिअरच्या पत्नीची मुलाला घेऊन 18 व्या मजल्यावरुन उडी

अशातच शेखपुराचे एसडीपीओ, डॉ. राकेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. अवघ्या 12 तासांच, पोलीस तांत्रिक पथक आणि एसआयटीने आरोपी अमित कुमारला लखीसराईतून अटक करण्यात आली, तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली होती.