"मी गेल्यानंतर दुसरं लग्न कर", इंजिनिअरच्या पत्नीची मुलाला घेऊन 18 व्या मजल्यावरुन उडी

Pune Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये 33 वर्षीय महिलेचा सहा वर्षांच्या मुलासह मृत्यू झाला. घटनास्थळी सात ते आठ पानांची चिठ्ठी मिळाली असून वाकड पोलीस तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Pune Crime News
Pune Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

"मी गेल्यानंतर दुसरं लग्न कर",

point

इंजिनिअरच्या पत्नीची मुलाला घेऊन 18 व्या मजल्यावरुन उडी

Pune Crime News, पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एका 33 वर्षीय महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह इमारतीवरून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. एकता बांगड असं मृत महिलेचं नाव असून, ती पती आणि मुलासह पिंपरी-चिंचवडमधील सिग्नेचर पार्क येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होती. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. एकता यांचे पती मनोज बांगड हे पुण्यातील एका आयटी कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून काम करतात. शुक्रवारी (30 ऑक्टोबर) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी घरात एकता आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा उपस्थित होता. त्यानंतर एकता मुलाला घेऊन इमारतीच्या 18 व्या मजल्यावर गेल्या. तेथून खाली पडल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा : Solapur Politics : कट्टर राजकीय विरोधक एकत्र का आले? सोलापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

घटनास्थळी सात ते आठ पानांची एक चिठ्ठी मिळाली

या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात एकता या गेल्या अनेक वर्षांपासून मणक्याच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेतले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या या आरोग्यविषयक त्रासाचा उल्लेखही त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी सात ते आठ पानांची एक चिठ्ठी मिळाली आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली असून, त्यातील मजकुराच्या आधारे तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : '..म्हणून संजय राऊत बाळासाहेबांना आवडत नव्हते', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

माय-लेकाच्या मृत्यूमुळे बांगड कुटुंबावर दुःखाचा डोंगर 

पोलिसांच्या माहितीनुसार, या चिठ्ठीमध्ये एकता यांनी पती मनोज यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्यानंतर दुसरं लग्न करून आयुष्य नव्याने सुरू कर, असा उल्लेख त्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुलाला आईची आठवण येईल आणि तो वारंवार वडिलांना आई कुठे आहे, अशी विचारणा करेल, अशी भीतीही त्यांनी चिठ्ठीत व्यक्त केली होती. मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आणि त्याच्या भविष्यासंदर्भातील काही बाबींचाही उल्लेख या चिठ्ठीत असल्याचं सांगण्यात येत आहे. मुलगा सोबत असल्यामुळे पतीला भविष्यात दुसरं लग्न करणं कठीण होऊ शकतं, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे. या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

एकता आणि त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमुळे बांगड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर सिग्नेचर पार्क सोसायटीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. वाकड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मिळालेली सात ते आठ पानांची चिठ्ठी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतली आहे. एकता यांच्या आजारपणाची पार्श्वभूमी, त्यांनी घेतलेले उपचार आणि घटनेशी संबंधित इतर बाबींची माहिती पोलीस घेत आहेत. या घटनेमागील नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास वाकड पोलीस करत आहेत.