वहिनीच्या प्रेमात आकंठ बुडाला, भावाला संपवायला गेला पण झालं भलतंच, नेमकं काय घडलं?

जयपूरमध्ये हत्येचे एक भयानक प्रकरण उघडकीस आले आहे. एका चुलत भावाचे त्याच्या मेहुणीसोबत कथित प्रेमसंबंध होते. आरोपीने त्याला दारूचे आमिष दाखवून रेल्वे रुळाजवळ बोलवून त्याचा शेवट केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

चुलत भावाच्या बायकोसोबत अनैतिक संबंध

point

शेवटी केली हत्या

Crime News : जयपूरमध्ये नात्यांना काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वहिनीसोबतच्या प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या चुलत भावाचा एका नराधमाने निर्घृण खून केला आहे. भवानी ऊर्फ कालू असे या नराधम आरोपीचे नाव असून, त्याने आपल्याच चुलत भावाचा काटा काढण्यासाठी थरारक योजना आखली होती. मृताची ओळख 34 वर्षीय श्रवण सिंग अशी पटली असून, तो एका रेल्वे कंत्राटदाराकडे काम करत होता. जयपूरच्या बिंदायका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे रुळाजवळ ही संशयास्पद व भयानक घटना घडली.

आधी रेल्वेखाली ढकललं, नंतर...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर रोजी करवा चौथच्या दिवशी श्रवण व त्याचा चुलत भाऊ भवानी गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, गावी जाण्याऐवजी दोघे फुलेऱ्यात उतरले आणि तिथून लिफ्ट घेऊन सायंकाळी धानक्या येथे पोहोचले. यानंतर दोघे रेल्वे रुळाजवळ बसून मद्यपान करत असताना, भवानीने अचानक येणाऱ्या ट्रेनसमोर श्रवणला ढकलून दिले. या अपघातात श्रवण लांब जाऊन पडला आणि सुदैवाने त्याचा जीव वाचला, परंतु संतापलेल्या व क्रूर बनलेल्या आरोपीने त्यानंतर लोखंडी रॉड आणि दगडाने त्याच्या डोक्यावर सपासप वार करून त्याची हत्या केली.

हे ही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा लपंडाव, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

मृताच्या बायकोला फोन

या हत्येनंतर घटनेला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी आरोपीने अत्यंत चलाखीने मृतदेहापासून काही अंतरावर श्रवणचे चप्पल आणि बॅग फेकून दिली, जेणेकरून पोलिसांना हा रेल्वे अपघाताचा मृतदेह वाटावा. एवढेच नव्हे तर, या भयानक कृत्यानंतर आरोपीने थेट मृताच्या पत्नीला फोन करून त्याच्या मृत्यूची खोटी व भयंकर माहिती दिली आणि घटनास्थळावरून फरार झाला. 30 ऑक्टोबरच्या सकाळी रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळल्याने पोलीस तपासाला सुरुवात झाली आणि संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

हे ही वाचा : '..म्हणून संजय राऊत बाळासाहेबांना आवडत नव्हते', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

अनैतिक संबंधांतील अडथळा

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी भवानीचे आपल्या चुलत भावाच्या म्हणजेच श्रवणच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. श्रवणला त्यांच्या या प्रकरणाची आणि अनैतिक संबंधांची कुणकुण लागली होती, ज्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद व शत्रुत्व वाढत गेले. याच जुन्या वादातून आणि प्रेमाच्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी भवानीने ही खळबजनक योजना आखली होती. सध्या पोलीस या प्रकरणात मृताच्या पत्नीची नेमकी भूमिका आणि इतर सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.