गर्लफ्रेंडच्या नादात वेडा झाला, पोटच्या जुळ्या मुलींसह आणखी एका लेकीसोबत क्रूर कृत्य

मुंबई तक

crime news : अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका नराधम पित्याने आपल्या तीन निष्पाप मुलींची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

गर्लफ्रेंडच्या नादात वेडा झाला

point

पोटच्या जुळ्या मुलींसह आणखी एका लेकीसोबत क्रूर कृत्य

Crime News : एका 45 वर्षीय पित्याने सोमवारी पहाटेच्या सुमारास आपल्या तीन निष्पाप मुलींची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये 12 वर्षांची पल्लवी कुमारी आणि 6 वर्षांच्या जुळ्या बहिणी रिद्धि व सिद्धि यांचा समावेश आहे. पहाटेच्या वेळी जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा या नराधमाने अत्यंत क्रूरतेने मुलींवर हल्ला केला, ज्यामध्ये तिन्ही मुलींचा जागीच दुर्दैवी अंत झाला. नंदू यादव ऊर्फ नंदकिशोर यादव असं आरोपी बापाचं नाव आहे. 

हेही वाचा : बीड : ‘तू काळी अन् पांढऱ्या पायाची आहेस..’, विवाहितेचा अनन्वित छळ करुन हत्या

जुळ्या बहिणींसह आणखी एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात 

या थरारक घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मुलींच्या किंकाळ्या ऐकून नंदू यादव याची पत्नी राधा देवी हिची जाग झाली. तिने आपल्या डोळ्यासमोर मुलींना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यानंतर उन्मादी झालेल्या नंदूने आपल्या पत्नीवर आणि लहान मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून राधा देवी यांनी आपल्या मुलाला कडेवर घेतले आणि जीव वाचवण्यासाठी घरच्या बाहेर धाव घेतली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने स्वतःचा आणि मुलाचा जीव वाचवला. या घटनेमुळे गावामध्ये भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा : बायकोचा 'त्या' गोष्टीला नकार, नवऱ्याने थेट शेवटच केला, कुणाचा जीव गेला?

हे वाचलं का?