बायकोचा 'त्या' गोष्टीला नकार, नवऱ्याने थेट शेवटच केला, कुणाचा जीव गेला?

मुंबई तक

आपल्या आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीला क्रूरपणे मारहाण करून पोटात वाढणाऱ्या बाळाचा जीव घेणाऱ्या नराधम पतीला पोलिसांनी अटक करून तुरुंगात धाडले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

बायकोचा गर्भलिंग निदान चाचणीला नकार

point

नवऱ्याने थेट शेवटच केला

point

कुणाचा जीव गेला?

Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीला क्रूरपणे मारहाण करून पोटात वाढणाऱ्या बाळाचा जीव घेणाऱ्या नराधम पतीला पोलिसांनी अटक करून तुरुंगात धाडले आहे. आरोपीचं नाव बबलू असं आहे. घरगुती वादातून त्याने गरोदर पत्नीच्या पोटावर लाथ मारली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने धक्कादायक कबुली दिली असून, पत्नीने गर्भलिंग चाचणी करण्यास नकार दिल्यामुळे संतप्त होऊन आपण तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. उत्तराखंडच्या डेहराडूनमधील ही घटना आहे.

पत्नीशी वाद अन् पोटातील बाळाचा मृत्यू

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. या दुर्दैवी प्रकरणात पीडितेचे वडील शेरसिंग यांनी मूळचा हरियाणाचा रहिवासी असलेल्या आपल्या जावयाविरुद्ध पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली होती. बबलूने पोलीस चौकशीत सांगितले की, त्याचा सीमासोबत 2020 मध्ये विवाह झाला होता. तो हरियाणातील पानिपत येथे प्रिंटिंग प्रेस चालवतो आणि केवळ शनिवार किंवा रविवारीच घरी येत असे. शनिवारी त्याचा पत्नीशी वाद झाला आणि रागाच्या भरात त्याने तिला लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली, ज्यामुळे तिच्या पोटातील निष्पाप बाळाचा मृत्यू झाला. 

हे ही वाचा : गुरू - शिष्याच्या नात्याला काळिमा! शिक्षकाने 5 विद्यार्थिनींवर केले लैंगिक अत्याचार

दोन मुलींना जन्म आणि मानसिक छळ

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी सीमा हिने लग्नानंतर दोन मुलींना जन्म दिला होता. मात्र, मुलगी झाल्यामुळे सासरचे लोक तिच्यावर प्रचंड नाराज होते आणि त्यांनी सीमाचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, सीमा तिसऱ्यांदा गरोदर राहिली. सीमा पुन्हा गरोदर राहिल्याचे समजताच पती बबलूने तिच्यावर गर्भातील बाळाची लिंग चाचणी करण्यासाठी सतत दबाव आणण्यास सुरुवात केली, ज्याला सीमाने स्पष्ट नकार दिला होता.

हे ही वाचा : वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे बादलीत भरुन ठेवले, पोटचीच मुलं का झाली निष्ठुर?

गर्भलिंग चाचणीला नकार

लिंग चाचणीला नकार दिल्याने संतापलेल्या बबलूने 8 जून रोजी दुपारी सीमाला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली. इतकेच नव्हे तर तिला करंट देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. या मारहाणीची माहिती मिळताच सीमाच्या वडिलांनी तातडीने धाव घेतली आणि पोलिसात तक्रार नोंदवली. एका बापाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्परतेने पावले उचलत या पाशवी कृत्य करणाऱ्या पतीला बेड्या ठोकल्या असून त्याची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे.
 

हे वाचलं का?