सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चढाओढ कायम

मुंबई तक

सोलापूर जिल्ह्यात राजकीय संघर्ष पेटला असून, पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांच्या नेमणुकीनंतर पक्षांतर्गत ताणतणाव निर्माण झाला. आगामी निवडणुकांसाठी विविध राजकीय हालचालींना वेग येताना दिसून येईल. तसेच याच निवडणुकीपूर्वी स्थानिक नेत्यांमध्ये नेतृत्वाला धरून चढाओढ कायम राहणार आहे.

ADVERTISEMENT

google news

Solapur Legislative Council : राज्यातील सोलापूर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यात चांगला वाद पेटला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या नेमणुकीनंतर स्थानिक पातळीवर राजकीय संघर्षात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. येत्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील बदल यामुळे पक्षातील तणावात अधिक वाढ झालेली पाहायला मिळतेय. भाजपच्या स्वतंत्र गटनिर्मितीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत सर्वच पक्षांनी राजकीय पक्ष या भागात संघर्षमय परिस्थितीत दिसून येत आहे. 

या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचेच आमदार उत्तमराव जानकर यांच्यातील वाद उफाळून आला आहे. मुलाला उमेदवारी न मिळाल्यामुळे उत्तमराव जानकर नाराज झाले असून त्यांनी थेट मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला, असं विधान करत नव्या वादाला तोंड फोडलं. त्यामुळे आता लोकसभेत एकत्र येणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये अचानक संघर्ष का सुरू झालाय? यावरून जोरदार चर्चा सुरू झालीय.

भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्षामुळे जिल्ह्याकील राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेतृत्वासाठी आणि मतदान अधिकारांसाठी संघर्ष चालू असल्याचे पाहायला मिळते. सोलापूर जिल्ह्याच्या भविष्याची दिशा ही याच निवडणुकीवर अवलंबून असणार आहे. 

याचपार्श्वभूमीचा विचार केल्यानस नागरिकांना देखील अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, येत्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. सोलापूरमध्ये सध्याची स्थितीबाबत आत्ताच भाष्य करणं गरजेचं नाही. 

हे वाचलं का?