सोलापूर: मुख्याध्यापकाला 'तो' नाद नडला, आधी पत्नी व दोन मुलांना विष दिलं अन्..

मुंबई तक

Solapur Suicide : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिथे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने दोन मुलांसह पत्नीला विष पाजून स्वत:चा जीवन संपवलं. या घटनेनं गाव हादरून गेलं आहे. शेअर मार्केटच्या नादाला लागून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासातून उघडकीस आली.

ADVERTISEMENT

Solapur Suicide
Solapur Suicide
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात धक्कादायक प्रकार

point

कुटुंबाला विष पाजून संपवलं जीवन

Solapur Crime : विजय बाबर - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिथे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने दोन मुलांसह पत्नीला विष पाजून स्वत:चा जीवन संपवलं. या घटनेनं गाव हादरून गेलं आहे. शेअर मार्केटच्या नादाला लागून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासातून उघडकीस आली. मृत व्यक्तींची मुख्याध्यापक योगेश पाटील वय (40 - 45), पत्नी माधुरी (वय 37), मुलगा शिवांश पाटील (वय 9) , मुलगा अथर्व पाटील (वय 11) अशी ओळख पटली. धक्कादायक हा प्रकार गुरूवारी रात्री घडला. 

हे ही वाचा : जालना: सावत्र बापाचं अमानुष कृत्य, पैशांच्या वादातून चिमुरड्याचे हात पाय बांधून..

 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती योगेश पाटील हे नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. काही काळापासून ते शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करत होते. मात्र, शेअर मार्केटमुळे सातत्याने घसरण होत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. 

याच नुकसानाची भरपाई करण्यासाठी तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जाचा डोंगर कमी होईल अशी अपेक्षा होती, मात्र कर्जाचा बोजा वाढू लागला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मानसिक ताण तणाव निर्माण झाला. याच हतबल झालेल्या मानसिकतेतून योगेश पाटील यांनी टोकाचं पाऊल उचललं. 

हे वाचलं का?