पुण्यात आंदोलानंतर मुलाखतीत काय म्हणाला अभिजीत दीपके?

मुंबई तक

Abhijit Dipke Interview : शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरूप देण्याचा निर्धार अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

Abhijit Dipke Intrview
Abhijit Dipke Intrview
Google CTA

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या प्रश्नावरून आंदोलनाला देशव्यापी स्वरूप

point

‘जंतर-मंतरने दाखवून दिले की तरुण रस्त्यावर उतरतात’

Abhijit Dipke Interview : शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरूप देण्याचा निर्धार अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतरही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने देशभर आंदोलन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

हे ही वाचा : 'नवरा कामावर गेल्यावर सासरा माझ्यासोबत...' सुनेनं गाठलं पोलीस स्टेशन; काय घडलं?

आईचा विरोध, पण आंदोलन सुरूच

पुण्यातील आंदोलनासाठी रवाना होताना आईने “आता हे सगळं थांबव” अशी विनंती केल्याचे दीपके यांनी सांगितले. मात्र हा लढा आता वैयक्तिक राहिलेला नसून हजारो-लाखो तरुणांचा झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी मागे सरकलो तर तरुणांचा विश्वासच उरणार नाही,” असे ते म्हणाले.

राजीनाम्याची मागणी का?

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना दीपके म्हणाले की, कोणतीही चूक झाली असेल तर तिची जबाबदारी स्वीकारणे ही सुधारण्याची पहिली पायरी असते. “विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे हे मान्य केल्याशिवाय व्यवस्था सुधारू शकत नाही,” असे त्यांनी सांगितले.

‘जंतर-मंतरने दाखवून दिले की तरुण रस्त्यावर उतरतात’

सोशल मीडियावरील पाठिंब्याबरोबरच प्रत्यक्ष मैदानात किती लोक उतरतील, या प्रश्नावर दीपके यांनी जंतर-मंतर आंदोलनाचे उदाहरण दिले. “लोक फक्त ऑनलाइन राहतील असे म्हटले जात होते; पण हजारो तरुण प्रत्यक्ष आले. पुण्यातील आंदोलन त्याहून मोठे होईल,” असा दावा त्यांनी केला.

हे वाचलं का?