सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडी, कोण मारणार बाजी?
Solapur Vidhanparishad : सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीतील भाजप आणि काँग्रेससह विविध राजकीय घडामोडींचा संक्षिप्त आढावा. राऊत आणि देशमुखांमध्ये कोण जिंकू शकतं? या निवडणुकीमुळे सोलापुरातील राजकीय गणितं निकालाआधीच कशी बदलली आहेत? याचं स्थानिक पत्रकारांनी केलेलं विश्लेषण.
ADVERTISEMENT
Solapur Vidhanparishad : सोलापूर विधानपरिषद निवडणुकीची राज्यभर चर्चा पाहायला मिळत आहे. अशास्थितीत राजकीय नेत्यांचा राजकीय दबाव देखील जाणवत आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन केंद्रीय मुख्य पक्षात अगदी स्थानिक पातळीवर का होईना सत्ता संघर्ष जाणवत आहे. याचमुळे सोलापूरमध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलेलं पाहायला मिळत आहे. सोलापुरात भाजपचे राजेंद्र राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत.भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी अदृश्य मतांचा दावा करत भाजपविरोधात आव्हान उभं केलंय.
या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा स्तरावरील कार्यकर्त्यांमुळे राजकीय घडामोडी आता गुंतागुंतीच्या स्वरुपात निर्माण होताना दिसतायत. स्थानिक नेते आणि मंत्र्यांच्या मतभेदांचा देखील या निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांची सक्रियता पाहता आणि मतदारांच्या प्रतिक्रिया पाहता हिच हेच या निवडणुकीचे टर्निंग पाईंट ठरेल.
ही निवडणूक सोलापूरची असली तरीही स्थानिक पातळीवर उमेदवारांच्या लोकप्रियतेच्या मुद्द्यासह राजकीय दबाव देखील फॅक्टर आहे. याचबरोबर स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक अधिकच रोमांचक बनली आहे. दरम्यान, भाजप-काँग्रेस यासह इतर पक्षही आपापल्या रणनीतींवर काम करताना दिसते. अशातच मतदानादिवशी राजकीय वातावरण कसं असेल याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. सोलापूर निवडणुकीच्या टप्प्यावर लोकांचे मत आणि अपेक्षा तसेच राजकीय हालचाल ही महत्त्वपूर्ण ठरेल.
दरम्यान, राऊत आणि देशमुखांमध्ये कोण जिंकू शकतं? या निवडणुकीमुळे सोलापुरातील राजकीय गणितं निकालाआधीच कशी बदलली आहेत? सोलापुरात आताचं चित्र काय आहे? याचं अचूक विश्लेषण सोलापूरच्या पंढरपुरातील पत्रकारांनी केलं आहे.









