आईला शिवीगाळ केली, मुलानं धारदार चाकूने हल्ला करत वर्गमित्राला संपवलं

मुंबई तक

Crime News : आदर्श इंटर कॉलेजमध्ये तास सुरू असताना एका मुलाने आपल्याच वर्गातील सहकाऱ्यावर हल्ला केला. याच घटनेनं परिसर पूरता हादरून गेला. परिस्थिती पाहता शिक्षक आणि परिसरातील लोकांनी मुलाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

दहावीच्या विद्यार्थ्याने वर्गमित्रावर चाकूने केला हल्ला

point

विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात

Crime News : उत्तर प्रदेशातील चंदौली कोतवाली परिसरातील प्रतापपुरमध्ये शुक्रवारी सकाळी आदर्श इंटर कॉलेजमध्ये तास सुरू असताना एका मुलाने आपल्याच वर्गातील सहकाऱ्यावर हल्ला केला. याच घटनेनं परिसर पूरता हादरून गेला. परिस्थिती पाहता शिक्षक आणि परिसरातील लोकांनी मुलाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

हे ही वाचा : Astrology : सूर्य आणि बुधाच्या युतीने बुधादित्य राजयोगची निर्मिती, 'या' राशींचे भाग्य उजडेल

पोलिसांनी संबंधित किशोरवयीन विद्यार्थ्याला चाकूसह ताब्यात घेतले असून संबंधित प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. प्रतापपूर गावातील आदर्श इंटर कॉलेजच्या खाजगी विद्यालयात गेल्या दहा दिवसांपासून शिकवणीचे वर्ग सुरू होता. या शिकवणी वर्गात फतेहपूर आणि प्रतापपूर गावातील पंधरा विद्यार्थी तासाला उपस्थित होते. 

दहावीच्या विद्यार्थ्याने वर्गमित्रावर चाकूने केला हल्ला

शुक्रवारी सकाळी 8 वाजता वर्ग सुरू झाला असता, व्यवस्थापकाचा भाऊ असलेला शिक्षक शिवदयाल यादव गणित विषयाचे शिक्षण घेत होते. फतेहपूरच्या इयत्ता दहावीच्या एका विद्यार्थ्याने, आपल्या दप्तरातून चाकू काढला आणि वर्गमित्रावर हल्ला केला. विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, इतक्यात चार दिवसांपूर्वी किशोरवयीन मुलाला पकडून पोलिसांनी ताब्यात दिले. 

आरोपी मुलाचे वडील सियाराम हे जिल्हा रुग्णालयात महिला विभागात कंत्राटी म्हणून कार्यरत होते. त्यांनीच रुग्णालयातून तो चाकू आणला होता. विद्यार्थ्याने तो चाकू विद्यालयात आणला, याबाबतची माहिती कोणालाच नव्हती. 

हे वाचलं का?