पती नर्सचा किस करताना दिसला, डॉक्टर महिलेला सहन झालं नाही; अन्...

मुंबई तक

Crime News : महिला डॉक्टराचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. डॉक्टर नवऱ्याचे रुग्णालयातील नर्सशी अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा पीडितेच्या आई वडिलांचा आरोप आहे. एका सीसीटीव्हीत जावई नर्सचे चुंबन घेताना दिसत असल्याचा आरोप करण्यात आला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

डॉक्टर पियुषचे निर्ससोबत प्रेमसंबंध

point

'सीसीटीव्हीत नर्सचे चुंबन घेताना पियुष'

Crime News : एका महिला डॉक्टराचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृत महिला डॉक्टरची ओळख मिनाक्षी सूद अशी ओळख पटली आहे. मीनाक्षीचा नवरा पियुष सूद हा डॉक्टर आहे. काही महिन्यांपासून दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे, त्यांच्यात अनेकदा मतभेद देखील निर्माण झाले होते. मीनाक्षीचा नवरा पियुष हा जालंधर येथील एका नॅशनल आय रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होता. हा धक्कादायक प्रकार पंजाबच्या जालंभद येथे घडला आहे. 

हे ही वाचा : गुरू - शिष्याच्या नात्याला काळिमा! शिक्षकाने 5 विद्यार्थिनींवर केले लैंगिक अत्याचार

बुधवारी मिनाक्षीचा मृतदेह एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मीनाक्षीचे वडील प्रमोद यांनी सांगितलं की, त्यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. लग्नानंतर थार गाडी विकत घेतली होती, त्या गाडीचा हप्ता तिच भरत होती. एवढंच नाही,तर पियुषने मुलीवर अडीच कोटींचं कर्ज काढलं होतं.  

डॉक्टर पियुषचे निर्ससोबत प्रेमसंबंध

संबंधित प्रकरणात डॉक्टर पियुषचे एका निर्ससोबत प्रेमसंबंध असल्याचा मीनाक्षीच्या आईने आरोप केला. आमच्या मुलीला बेदम मारहाण केली जायची. अनेकदा मारहाण केल्यानंतर जावई फोन करून सांगायचा की, मीनाक्षीला मारहाण केली, त्याच्याकडून चूक झाली. आई म्हणाली, सध्या ही आत्महत्या असल्याचे म्हटले जाते. मात्र ही आत्महत्या आहे की, हत्या याबाबतची माहिती नाही. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

हे ही वाचा : बीड : ‘तू काळी अन् पांढऱ्या पायाची आहेस..’, विवाहितेचा अनन्वित छळ करुन हत्या

'सीसीटीव्हीत नर्सचे चुंबन घेताना पियुष'

मीनाक्षीच्या वडिलांचा आरोप आहे की, त्यांच्या जावयाचे त्याच रुग्णालयातील एका नर्ससोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याचा संशय आल्याने, मुलीने रुग्णालयातील सीसीटीव्हीचे फुटेज देखील तपासले आहेत. त्याच सीसीटीव्हीत नर्सचे चुंबन घेताना पियुष दिसत होता. दरम्यान, डॉक्टर पियुषचे त्यांच्या मुलीला बेदम मारहाण करायचा. वडील म्हणून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत तिचा विवाह लावून द्यायचा होता, असे त्यांचं म्हणणे होते. त्यांनी यापूर्वी तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

हे वाचलं का?