अकोटमध्ये यूरिया खतासाठी शेतकर्‍यांचा संघर्ष, पहाटेपासून लावल्या रांगा

मुंबई तक

Maharashtra Farmer : खरीप हंगाम तोंडावर असताना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात शेतकरी यूरिया खतासाठी संघर्ष करत असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी पहाटेपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं दिसून येतंय. शेतकरी आणि कृषि सेवा केंद्र दुकानदारांमध्ये तणाव आणि बाचाबाचीमुळं तणावाचं वातावरण तयार झाले आहे.

ADVERTISEMENT

google news

Maharashtra Farmer : खरीप हंगाम तोंडावर असताना अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात शेतकरी यूरिया खतासाठी संघर्ष करत असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी पहाटेपासून शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं दिसून येतंय. शेतकरी आणि कृषि सेवा केंद्र दुकानदारांमध्ये तणाव आणि बाचाबाचीमुळं तणावाचं वातावरण तयार झाले आहे. यामुळं पोलिसांना मध्यस्थी करावी लागत आहे. खताच्या टंचाईमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. 

शेतकऱ्यांना युरियाचे खत मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुकानदार आणि शेतकऱ्यांमध्ये वाद होताना दिसतोय. तसेच काही महिला देखील रांगेत उभ्या होत्या. केवळ अकोटच नाही,तर इतर ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती निर्माण झाली. सद्यस्थिती लक्षात घेता, स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेत नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आगामी काळात याच समस्येवर उपाययोजना करावी. 

युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहे. तातडीने कृषी सेवा केंद्रांमध्ये सुधारणा करणे आणि खतामुळे होणाऱ्या तणावाला सूट देणे महत्त्वाचे आहे.

 

हे वाचलं का?