बदलापूर: साडी घेऊन देण्याचा वाद, बायकोनं नवऱ्याच्या डोक्यात कुकर घालत संपवलं

मुंबई तक

Badlapur crime news : बदलापूरच्या शिरगाव परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साडी घेऊन देण्याच्या वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना समोर आली. संबंधित प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नी देवी हिला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Badlapur crime news
Badlapur crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नीचा पतीच्या डोक्यात कुकरने हल्ला 

point

मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न

Badlapur Crime News : बदलापूरच्या शिरगाव परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साडी घेऊन देण्याच्या वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना समोर आली. संबंधित प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नी देवी हिला अटक केली आहे. नवऱ्याची ओळख हरिराम सिंग आणि पत्नी सुनीता देवी अशी ओळख समोर आलेली आहे. काही दिवसांपासून त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद सुरू झाल्याचं चित्र आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट, फोटो व्हायरल

पत्नीचा पतीच्या डोक्यात कुकरने हल्ला 

रविवारी सायंकाळी याच कारणावरून मोठा वाद सुरू झाला होता. याच वादादरम्यान सुनीता देवीने कुकरने डोक्यात हल्ला करून हरिराम सिंग यांचा गळा आवळत हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर दाम्पत्याचा सात वर्षांचा मुलगा शेजाऱ्यांकडे धावत गेला आणि घरात घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. शेजाऱ्यांनी घरात जाऊन पाहिलं असता, हरिराम सिंह हे बेशुद्ध अवस्थेत पडले आहेत. 

मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न

परिस्थिती पाहून हरिराम सिंग हे बेशुद्धवस्थेत पडले होते. नंतर त्यांना रुग्णालयात नेले होते, मात्र मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अशातच शवविच्छेदन अहवालात हरिराम सिंग यांच्या डोक्याला गंभीरपणे दुखापतपणे मारहाण आणि गळा आवळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा खून असल्याचे निष्पन्न झाले. 

हे ही वाचा : दिल्लीच्या आंदोलनात मनोज जरांगे, अभिजीत दिपकेशी काय चर्चा?

अशातच पूर्व बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पत्नी सुनीता देवी हिला अटक करण्यात आली होती. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास सुरू ठेवण्यात आला आहे.  

हे वाचलं का?