गर्लफ्रेंडला करायचा होता ब्रेकअप, बॉयफ्रेंडने उचलले टोकाचे पाऊल, केलं नको तेच!
मध्य प्रदेशातील सतना येथे दिवसाढवळ्या स्कूटर चालवणाऱ्या एका तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, पण काही कारणास्तव त्यांचे नाते तुटले. त्यामुळे व्यथित झालेल्या प्रियकराने हे पाऊल उचलले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गर्लफ्रेंडला करायचा होता ब्रेकअप
बॉयफ्रेंडने उचलले टोकाचे पाऊल
नेमकं काय घडलं?
Crime News : मध्य प्रदेशातील सतना येथे कलेक्ट्रेट गेटजवळ दिवसाढवळ्या स्कूटीवरून जाणाऱ्या एका तरुणीवर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
चाकूने केले सपासप वार
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती स्कूटीवरून जात असताना अचानक मागून आलेल्या एका तरुणाने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. सुरुवातीला आपल्याला कुणी मारले हे तिला समजलेच नाही, कारण आरोपीने पाठीमागून हल्ला केला आणि तो लगेचच फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीचे नाव सागर ऊर्फ सूरज जाटव असे असून तो आणि पीडित तरुणी एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते.
हे ही वाचा : 'डोळ्यांदेखत पीक करपून गेलं...' बीडमधील तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, ग्रामस्थांची मागणी काय?
दोन वर्षांपासून प्रेमसंबंध
पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि सदर तरुणीचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही काळापूर्वी तरुणीने त्याच्याशी बोलणे आणि संपर्क ठेवणे बंद केले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने तरुणीवर हा भ्याड हल्ला केला. सुदैवाने, हल्ल्यानंतर तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा : "माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न, मी त्यांच्याप्रमाणे पक्ष बदलणार नाही", स्वीडनमधून पुतणीचा विखेंना टोमणा
दीड तासात आरोपीला अटक
दिवसाढवळ्या घडलेल्या या चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. आरोपीच्या शोधासाठी विविध पथके नेमून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आणि अवघ्या दीड तासात टिकुरिया टोला परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी थेट कारागृहात केली आहे.
