'डोळ्यांदेखत पीक करपून गेलं...' बीडमधील तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन, ग्रामस्थांची मागणी काय?
बीडमधून एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डोळ्यांदेखत पीक करपून गेलं...
बीडमधील तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन
ग्रामस्थांची मागणी काय?
Beed Suicide News, रोहिदास हातागळे : एकीकडे राज्यभरात आज लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकांची धूम सुरू असतानाच, दुसरीकडे बीड जिल्ह्याला सुन्न करणारी अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील सतीश शिवाजी कोळगिरे (वय 35) या अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीला कंटाळून स्वतःच्या शेतातील विजेच्या खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज (25 सप्टेंबर) सकाळी 7 च्या सुमारास त्यांनी कपड्याने तोंड बांधून विजेच्या खांबाला दोरीने गळफास घेतलेला आढळून आला.
डोळ्यांदेखत करपले पीक
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. कोळगिरे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सतीश यांच्या नावावर केवळ अर्धा एकर आणि संपूर्ण कुटुंबाकडे मिळून तीन एकर जमीन आहे. अल्प जमिनीतून कुटुंब चालवणे कठीण झाल्याने सतीश गेल्या पाच वर्षांपासून गावातच सालगडी म्हणून काम करत होते. बीड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक डोळ्यांदेखत करपून गेले.
हे ही वाचा : "माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न, मी त्यांच्याप्रमाणे पक्ष बदलणार नाही", स्वीडनमधून पुतणीचा विखेंना टोमणा
दुष्काळ जाहीर न केल्याने संताप
आधीचे कर्ज आणि त्यात पिकांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे सतीश प्रचंड आर्थिक अडचणीत व मानसिक तणावात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मराठवाडा दुष्काळ पाहणी दौरा केला होता, मात्र अद्याप दुष्काळ जाहीर न झाल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशातच घरातील कर्ता पुरुष अचानक निघून गेल्याने कोळगिरे कुटुंबावर दुःखाचा आणि आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा : घरातच रंगला रक्तरंजित थरार! पोलिसाच्या डोक्यात गोळी झाडून मुलाकडून हत्या, कारण काय?
ग्रामस्थांची मागणी काय?
सण-उत्सवाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे राडी गावासह संपूर्ण अंबाजोगाई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या कठीण प्रसंगी शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
