शिक्षिकेच्या प्रेमकहाणीचा शाळेतच झाला भीषण अंत, नाराज बॉयफ्रेंडने केलं होत्याचं नव्हतं

मुंबई तक

लखीमपूर खेरी येथील एका शाळेत महिला शिक्षिका निशात फातिमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपी सौद अन्सारी यानेही स्वतःवर गोळी झाडून घेतली. तपासात असे उघड झाले आहे की, ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. घटनेवेळी नेमकं काय घडलं, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शिक्षिकेच्या प्रेमकहाणीचा शाळेतच झाला भीषण अंत

point

नाराज बॉयफ्रेंडने सगळंच संपवलं

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका शाळेत महिला शिक्षिकेची हत्या करून आरोपीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सऊद अंसारी असे आरोपीचे नाव असून तो बंदुकीसह शाळेत दाखल झाला आणि त्याने शिक्षिका निशात फातिमा हिच्यावर गोळी झाडली. या हल्ल्यानंतर आरोपीने जागीच स्वतःलाही संपवले. पोलीस तपासात उघड झाले आहे की निशात आणि सऊद हे दोघे गेल्या 11 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी बालपणी एकाच शाळेत शिक्षण घेतले होते. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील ही घटना आहे.

'अशी' आहे प्रेमकहाणी

माहितीनुसार, सुमारे 11 वर्षांपूर्वी निशातचे कुटुंब लखीमपूर येथे राहण्यास आले होते, जिथे त्यांनी आरोपी सऊदच्या वडिलांचे घर भाड्याने घेतले होते. यादरम्यान दोन्ही कुटुंबांमध्ये ओळख झाली आणि 'चिल्ड्रन्स अकॅडमी' शाळेत एकत्र शिकणाऱ्या निशात आणि सऊद यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. इंटरमिडिएट उत्तीर्ण झाल्यानंतर दोघे वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षणासाठी गेले. सुमारे एक वर्षापूर्वी निशात फातिमा हिला त्याच 'चिल्ड्रन्स अकॅडमी' शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली होती.

हे ही वाचा : अशोक चव्हाण ते मिलिंद देवरा.., दिग्गजांना जाऊ दिलं, मग बोंद्रेंना का रोखलं? Inside स्टोरी

लग्न ठरल्याची चर्चा अन्...

नोकरी लागल्यानंतर निशातने सऊदशी बोलणे कमी केले होते आणि दरम्यानच्या काळात तिचा विवाह दुसऱ्या ठिकाणी ठरल्याची चर्चा होती. या गोष्टीमुळे संतप्त झालेल्या सऊदने हत्येचा कट रचला. सकाळी 11 च्या सुमारास तो बॅगेत बंदूक लपवून शाळेत पोहोचला. वर्गासमोरच त्याने निशातवर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली. या घटनेआधीचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे, ज्यामध्ये सऊद शिक्षिकेला जबरदस्तीने पकडून पहिल्या मजल्याकडे ओढत नेताना दिसत आहे.

हे ही वाचा : 'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंची सडकून टीका, विरोधकांना आंदोलनाची हाक!

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं?

या अचानक झालेल्या गोळीबारामुळे शाळेतील मुले आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आरोपी शाळेत शस्त्र घेऊन कसा पोहोचला आणि घटनेच्या वेळी नेमके काय घडले, याचा पोलीस शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.