मुलगा दारु पिऊन घरी आला अन् सावत्र आईवर चाकूने सपासप केले वार, 'त्या' रात्री काय घडलं?

मुंबई तक

घरातील लाईटवरुन झालेल्या एका किरकोळ वादाने जीवघेणे वळण घेतले. तरनतारनमध्ये एका रात्री दारू प्यायलेला मुलगा घरी परतला आणि त्याने दिवे लावले. जेव्हा त्याच्या सावत्र आईने आक्षेप घेतला, तेव्हा त्या तरुणाने तिच्यावर चाकूने वारंवार वार केले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुलगा दारु पिऊन घरी आला अन्...

point

सावत्र आईवर चाकूने सपासप केले वार

point

'त्या' रात्री काय घडलं?

Crime News : घरातील लाईट लावण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद इतका विकोपाला गेला की एका महिला सदस्याला आपला जीव गमवावा लागला. दारूच्या नशेत घरी आलेल्या सावत्र मुलाने आपल्या आईवर चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मांडी, कंबर, छाती आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्याने गुरप्रीत कौर या महिलेचा जागीच मृत्यू झाला. पंजाबच्या तरनतारन मधील ही घटना आहे.

'त्या' रात्री काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बुधवारी (23 सप्टेंबर) रात्री सुमारे साडेसात वाजेच्या सुमारास घडली. संशयित आरोपी लवप्रीत सिंह हा दारूच्या नशेत धुंद होऊन घरी आला होता. सुरुवातीला त्याचे स्वतःच्या पत्नीशी भांडण झाले, त्यानंतर 10 मिनिटांनी खाली येऊन त्याने सावत्र आई गुरप्रीत कौर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. शाब्दिक चकमकीदरम्यान त्याने अचानक चाकू काढून गुरप्रीत यांच्यावर सपासप वार केले.

हे ही वाचा : ज्ञानेश कुमारांना हटवणं एवढं सोप्पं आहे का? प्रक्रिया एकदा पाहा!

दारु पिऊन यायचा आणि...

घटनेच्या वेळी घरातील इतर सदस्य उपस्थित होते. मृत महिलेची मुलगी हरकमल कौर हिने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत लवप्रीतने अनेक गंभीर वार केले होते. गुरप्रीत कौर यांचे लग्न 25 वर्षांपूर्वी सुखदेव सिंह यांच्याशी झाले होते. सुखदेव सिंह यांच्या पहिल्या पत्नीपासून लवप्रीत सिंह आणि दुसरा मुलगा अशी दोन मुले होती. लवप्रीत नेहमी दारू पिऊन उशिरा घरी यायचा आणि घरातील सर्व लाईट लावून ठेवायचा, ज्याला गुरप्रीत यांचा विरोध असायचा. या रोजच्या किरकोळ वादातूनच हे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : 'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंची सडकून टीका, विरोधकांना आंदोलनाची हाक!

पोलिसांनी काय सांगितले?

या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.