ज्ञानेश कुमारांना हटवणं एवढं सोप्पं आहे का? प्रक्रिया एकदा पाहा!
chief election commissioner gyanesh kumar impeachment removal process : मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया आहे? खासदारांच्या स्वाक्षऱ्यांपासून संसदेतील मतदानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया आहे?
खासदारांच्या स्वाक्षऱ्यांपासून संसदेतील मतदानापर्यंत जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
chief election commissioner gyanesh kumar impeachment removal process : निवडणूक आयोगातील मुख्य आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर देशभरात खळबळ उडालीये. अशात विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील इतर नेते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार ( Gyanesh Kumar ) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पण ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर विरोधी पक्षाला महाभियोग ( impeachment ) आणावा लागेल, त्याची प्रक्रिया नेमकी कशी समजून घेऊयात..
मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांमधील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर त्यांना पदावरून हटवण्यासाठी घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरुन हटवण्यासाठी जी प्रक्रिया राबवता येते, तशीच प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पदच्युत करण्यासाठी करावी लागते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324(5) मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांना पदच्युत करण्यासाठीची प्रक्रिया आणि तरतूद नमूद करण्यात आलीये. 2023 च्या Chief Election Commissioner and Other Election Commissioners (Appointment, Conditions of Service and Term of Office) Act मधील कलम 11 मध्येही मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनामा आणि पदावरून हटवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना लेखी राजीनामा देऊ शकतात; मात्र त्यांना हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे प्रक्रिया राबवावी लागते.
मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यासाठी प्रक्रिया काय?
ही प्रक्रिया थेट सुरू होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पदच्युतीसाठी असलेल्या Judges (Inquiry) Act, 1968 मधील प्रक्रियेप्रमाणे सुरुवातीला संसदेत ठराव मांडण्यासाठी नोटीस द्यावी लागते. लोकसभेत ही नोटीस देण्यासाठी किमान 100 खासदारांच्या स्वाक्षऱ्या, तर राज्यसभेत किमान 50 खासदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेचे सभापती उपलब्ध सामग्रीचा विचार करून ठराव स्वीकारू किंवा नाकारू शकतात. ठराव स्वीकारल्यास चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली जाते. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक नामांकित विधिज्ञ यांचा समावेश असतो.
