माणुसकीला काळिमा! महिलेला बेदम मारहाण, चिमुकलीने मृतदेहाला मारली मिठी
Crime News : एका महिलेला बेदम मारहाण करत तिची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. महिलेला दगडाने ठेचून ठार केल्याचा पोलिसांना संशय आहे. संबंधित घृणास्पद गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीने महिलेच्या दीड वर्षाच्या मुलीला महिलेच्या मृतदेहावर ठेवले होते. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेनं परिसर हादरून गेला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिलेला बेदम मारहाण करत
महिलेचे शुभम नावाच्या तरुणासोबत विवाह बाह्य प्रेमसंबंधाचा आरोप
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
Crime News : कर्नाटकात मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रायचुर जिल्ह्यात एका महिलेला बेदम मारहाण करत तिची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. महिलेला दगडाने ठेचून ठार केल्याचा पोलिसांना संशय आहे. संबंधित घृणास्पद गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीने महिलेच्या दीड वर्षाच्या मुलीला महिलेच्या मृतदेहावर ठेवले होते. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेनं परिसर हादरून गेला होता.
हे ही वाचा : उल्हासनगर - 3 मध्ये विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
हा धक्कादायक प्रकार सिंधानूर येथील आहे. पीडिता मृत महिलेची स्नेहा ( वय 25) अशी ओळख समोर आली. महिलेचा मृतदेह हा गावाबाहेर शेतात ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनुसार, पोलिसांनी या घटनेत पती आणि तिचा प्रियकर अशा दोन संशयितांना ताब्यात घेतले होते.
मृत महिलेच्या आईने तिचा मृतदेह पाहताच मिठी मारली आणि ती जोराने रडू लागली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ते घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पीडित मुलगी श्वास घेत होती. मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती सिंदानूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू ठेवला. प्राथमिक तपासानुसार, महिलेचे वर्षापूर्वी अमित नावाच्या व्यक्तीशी झाले होते.
महिलेचे शुभम नावाच्या तरुणासोबत विवाह बाह्य प्रेमसंबंधाचा आरोप
संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, महिलेचे शुभम नावाच्या तरुणासोबत विवाह बाह्य प्रेमसंबंध होते. पोलीसांनी दोन्ही व्यक्तींशी तपास केला होता. खूनामागील नेमका हेतू काय याचा पोलीस तपास करत आहेत. महिलेच्या शरीराला तिची चिमुरडी मुलगी मिठी मारून रडत होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान महिलेचे श्वास सुरूच होते. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना तिने अंतिम श्वास घेतला.
