Maharashtra Weather : गणरायाला निरोप देण्यासाठी वरुणराजा बरसणार, मुंबई, पुण्यात काय ?
Maharashtra weather : राज्यात काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 25 सप्टेंबर 2026 रोजी पृष्ठभागावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. ऐनवेळी या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात पृष्ठभागावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता
काही भागांतील जिल्ह्यांना पावसाचा यलो-ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात सध्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवविलेली आहे. तर काही भागांत हवामान कायम राहिलेलं दिसून येतंय. तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 25 सप्टेंबर 2026 रोजी पृष्ठभागावर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. ऐनवेळी या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलाय.
हे ही वाचा : "इंदिरा गांधी यांच्याविरोधात पसरली होती लाट, मग मोदी आणि शाहा.. ", राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
कोकण
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर जळगाव जिल्ह्यात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे, याचा यलो अलर्ट जारी केला.
