"इंदिरा गांधी यांच्याविरोधात पसरली होती लाट, मग मोदी आणि शाहा.. ", राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

मुंबई तक

Rahul Gandhi : बांगलादेशात जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर एकाच वर्षांत इंदिरा गांधी यांच्याविरोधात लाट पसरली होती अशी त्यांनी आठवण करून दिली. थोडक्यात राहुल गांधी यांच्या म्हणण्याचा अर्थ असाय की, निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या सततच्या या गैरप्रकारांमुळे सध्याच्या सरकारला जनतेनं विरोध करूनही एकाच बाजूने निकाल लागत आहे.

ADVERTISEMENT

Rahul Gandhi
Rahul Gandhi
Google CTA

बातम्या हायलाइट

point

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा व्हिडिओ दाखवून काय म्हणाले राहुल गांधी? 

point

इंदिरा गांधींचा तो दाखला देत राहुल गांधी काय म्हणाले?

Rahul Gandhi : बांगलादेशात जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्यानंतर एकाच वर्षांत इंदिरा गांधी यांच्याविरोधात लाट पसरली होती अशी त्यांनी आठवण करून दिली. थोडक्यात राहुल गांधी यांच्या म्हणण्याचा अर्थ असाय की, निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या सततच्या या गैरप्रकारांमुळे सध्याच्या सरकारला जनतेनं विरोध करूनही एकाच बाजूने निकाल लागत आहे. अशातच राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयोग अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर काही प्रश्न उपस्थित केलेत. 

हे ही वाचा : ज्ञानेश कुमार यांनी मोदींच्या घरात चपरासी म्हणून राहावं - अभिजीत दीपके

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा व्हिडिओ दाखवून काय म्हणाले राहुल गांधी? 

पुढे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा व्हिडिओ दाखवला होता. त्या व्हिडिओ अमित शाह म्हणतात की, "माझं वय वर्षे 61 असून येणाऱ्या 30 वर्षात भाजपच सत्तेत येणार हाच त्यांनी विचार करावा." नंतर राहुल गांधी म्हणाले की, "सत्तेच्या विरोधातील लाट ही एका व्यवस्थेचा भाग आहे. हे इतर राज्य आणि पक्षांत दिसून आली."

'इंदिरा गांधी यांच्याविरोधातही आली होती लाट'

"भाजप सत्तेवर आल्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांतील ही सुरूवातच्या स्तरातील सत्ताधारी लाट नाहीशी होणे, तोच लोकशाहीचा पाया असणार आहे. संविधानाने ही आपल्याला ताकद दिली आहे. हा त्याच एका पायाभूत संरचनेवर होणारा हल्ला आहे. आम्ही म्हणतो की, ही समस्या व्यवस्थेतच आहे. सर्व मुख्यमंत्री, सर्व पंतप्रधानांना सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला आहे. मी स्वत: राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातून येतो, देशात सत्ताधाऱ्यांविरोधात लाट येतेच,  बांगलादेशात त्यावेळी युद्ध झाले होते त्यानंतर इंदीरा गांधी यांच्याविरोधात लाट निर्माण झाली होती," असं राहुल गांधी म्हणाले.  

हे ही वाचा : पालघर: रबर कंपनीची भिंत कोसळून तिघांचा दुर्देवी मृत्यू

राहुल गांधी म्हणाले की, "इराकमध्ये सद्दाम हुसेनच्या सत्ताविरोधी लाट नव्हती. उत्तर कोरियात देखील नाही. जगात सत्ताविरोधी लाटेशिवाय लोकशाही अस्तित्वात नाही. आपल्याला मतदान करूनच लोकशाहीला बळ मिळतेय, तर त्या मतांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे", असं राहुल गांधी म्हणाले.