ज्ञानेश कुमार यांनी मोदींच्या घरात चपरासी म्हणून राहावं - अभिजीत दीपके
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार यांना जर मोदींची खुशामतच करायची असेल, तर त्यांच्या घरी 'चपराशी' (शिपाई) बनणे अधिक बरे ठरेल. असं म्हणत अभिजीत दीपकेनी ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा, दीपकेंची मागणी
'ज्ञानेश कुमारांनी मोदींची घरी चपरासी म्हणून राहावं'
Abhijeet Dipke : "नुकताच निवडणूक आयोगाबाबत एक अहवाल आला होता. त्यामुळे कळते की निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार हा देशाचा मोठा गद्दार आहे. त्यांनी लवकरच राजीनामा द्यावा," अशी मागणी सीजेपी अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी मागणी केली. त्यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली आहे. "ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आहेत. जेव्हापासून ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक अधिकारी पदाच्या खुर्चीवर बसलेत त्यामुळे आता सरकारच ठरवतंय की कोण मतदान करणार? आणि कोण मतदान करणार नाही?", ज्ञानेश कुमार यांना जर मोदींची खुशामतच करायची असेल, तर त्यांच्या घरी 'चपराशी' (शिपाई) बनणे अधिक बरे ठरेल. असं म्हणत अभिजीत दीपकेनी ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
हे ही वाचा : आई-वडिलांनी मुलीला नाचण्यास केला विरोध, प्रकृती बिघडून 16 वर्षीय मुलीचा मृत्यू
अभिजीत दीपकेंचा 13 कोटींहून अधिक मतदारांची नावे गेल्याचा दावा
पुढे दीपके म्हणाले की, "ही लोकशाही नाही, आपण लोकशाहीच पालटून टाकली आहे. याला लोकशाही म्हणत त्यांनी याला हुकुमशाही म्हणजेच ऑटोक्रेसी म्हटलं आहे. ज्ञानेश कुमार हे देशद्रोही आहेत, सर्वात मोठे गुन्हेगार देखील आहेत. जेव्हा ते मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी म्हणून काम करत आहेत, तेव्हापासून महाराष्ट्रात 2 कोटी, उत्तर प्रदेशात 2 कोटी, पश्चिम बंगालमध्ये 90 लाख मतदान चोरण्यात आलेत. दिल्लीत 47 लाख मतदारांची यादीतून नावे वगळण्यात आलीत. तसेच केरळात 24 लाख मतदारांना मतदान करू दिले गेले नाही. तामिळनाडूत 97 लाख मतदारांची नावे काढण्यात आलीत. तेलंगणात 73 लाख मतदारांना मतदान करू दिले नाही, असे करून तब्बल 31 करोड मतदारांची नावे गायब आहेत. हा छोटा आकडा नाहीये.
'उद्धव ठाकरे, स्टॅलिन, ममता यांचा पराभव योगायोग नाही'
2024 ची लोकसभा निवडणूक आठवा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या विजयी उमेदवारांमध्ये असा कितीचा फरक होता? केवळ 2 टक्क्यांचा फरक होता. तो फरक मोठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून भाजप कधीच सत्तेतून बाहेर जाऊ नये. असं का केलं जात आहे? आता देशाचा मूड बदलत असून दुसरीकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, तसेच स्टॅलिन, ममता यांचा पराभव केला. या योगायोग असू शकतच नाही. जे मुख्यमंत्री एकत्र आले होते, त्यांना संपवलं. अशातच अभिजीत दीपके यांच्यानंतर पुढे सौरव दासने सरकारवर निशाणा साधला.
सौरव दास काय म्हणाले?
सौरव दास म्हणाला की, "देशाची थट्टा चालवली जात आहे. या देशातील सिस्टिम ही बदलणे गरजेची आहे. इंडियन एक्सप्रेंसचा दुजोरा देत सौरव दासने सांगितलं की, नवीन मतदारांची नाव नोंदणी केली जात नाही. यामुळे जेन झींना मतदान करता येणार नाही. याच एसआरआयच्या माध्यमातून सरकारने 13 कोटींहून अधिक मतदारांची नावे डिलिट केलीत, त्यांच्या मतदानाचा अधिकार आपण हिरावून घेतला", असं सौरव दासचे म्हणणे आहे.
