मुख्याध्यापक गालाला चुकीचा स्पर्श करायचा, विद्यार्थीनींच्या वॉशरुममध्ये डोकावून पाहायचा..पुढे काय घडलं?

मुंबई तक

बिहारच्या नवादा जिल्ह्यातील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकावर इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी विनयभंगाचे आरोप केले आहेत. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली असून, पॉक्सो कायद्यानुसार तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Bihar Crime News
Bihar Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुख्याध्यापक गालाला चुकीचा स्पर्श करायचा

point

विद्यार्थीनींच्या वॉशरुममध्ये डोकावून पाहायचा..पुढे काय घडलं?

बिहारमधील नवादा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी 52 वर्षीय मुख्याध्यापकावर विनयभंगाचे गंभीर आरोप केले आहेत. आनंदपुरा येथील शाळेचे मुख्याध्यापक महेश प्रसाद यादव विद्यार्थिनींना उचलून घेत होते, त्यांच्या गालाला स्पर्श करत होते. शिवाय स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्यांच्यामागे जात असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. स्वच्छतागृहात गेल्यानंतर मुख्याध्यापक डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही विद्यार्थिनींनी सांगितले. या आरोपांनंतर पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला. त्यांनी शाळेत जमून मुख्याध्यापकांविरोधात आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा : बीडचा मित्र, चॅट GPT ची मदत आणि मशरूमचा किस्सा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठे खुलासे

विद्यार्थीनींचा विनयभंग करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकाला अटक 

विद्यार्थीनींनी पोलीस आणि कुटुंबीयांना त्यांच्या आरोपांबाबत माहिती दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महेश प्रसाद यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. विद्यार्थिनींचा विनयभंग आणि अयोग्य हेतूने स्पर्श केल्याच्या आरोपांखाली कारवाई करण्यात आली असून, पॉक्सो कायद्यातील संबंधित तरतुदीही लावण्यात आल्या आहेत. 18 सप्टेंबर रोजी एका महिला पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचारी शाळेत पोहोचले. पोलिसांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली. विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्यात आले तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. नवादा जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे मुख्याध्यापकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांना औपचारिकरित्या अटक करण्यात आली.

हेही वाचा : भाजपच्या माजी आमदार नरेंद्र पवारांवरील बलात्काराच्या आरोपांनी चित्रा वाघही हादरल्या! म्हणाल्या...