तरुणांनी विद्यार्थिनीला गाडीत ओढले, अश्लील भाषा वापरत केली शिवीगाळ

मुंबई तक

Crime News : एका विद्यार्थिनीने गाडीतील तरुणाने तिच्याशी गैरकृत्य केल्याचा आरोप केला. अश्लील शेरेबाजी आणि तिला जबरदस्तीने गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला होता. अशातच पोलिसांनी या प्रकरणी तात्काळपणे कारवाई करत एफआरआय दाखल केला असून आरोपीला अटक केली.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News (AI Photo)
Google CTA

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थिनीवर गाडीत शेरोबाजी अन् शिवीगाळ

point

आरोपींवर गुन्हा दाखल 

Crime News : एका विद्यार्थिनीने गाडीतील तरुणाने तिच्याशी गैरकृत्य केल्याचा आरोप केला. अश्लील शेरेबाजी आणि तिला जबरदस्तीने गाडीत ओढण्याचा प्रयत्न केला होता. अशातच पोलिसांनी या प्रकरणी तात्काळपणे कारवाई करत एफआरआय दाखल केला असून आरोपीला अटक केली. या विद्यार्थिनीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला असून या प्रकरणाची अधिकची चर्चा सुरू आहे. ही घटना दिल्लीच्या मुखर्जीनगर परिसरातील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. हा धक्कादायक प्रकार 23 आणि 24 सप्टेंबरच्या रात्री घडली. 

हे ही वाचा : "इंदिरा गांधी यांच्याविरोधात पसरली होती लाट, मग मोदी आणि शाहा.. ", राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

विद्यार्थिनीवर गाडीत शेरोबाजी अन् शिवीगाळ

संबंधित प्रकरणात विद्यार्थिनीने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत तिने सांगितलं की, सफारी कारमधील मुलांनी सुरुवातीला शेरेबाजी केली. नंतर तोंडी शिवागाळ देखील केली होती. नंतर कार चालकाने त्या विद्यार्थीनीचा आणि तिच्या मैत्रिणीचा पाठलाग सुरू केला होता. पुढे पीडितेनं आरोप केला की, त्या तरुणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढळे आणि ज्यामुळे दोन्ही मुली अधिकच घाबरून गेल्या होत्या. 

आरोपींवर गुन्हा दाखल 

या घटनेची तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला होता. तपासादरम्यान दिसून आले की, DL11CF4447 या नंबर प्लेटची गाडी ही दुसऱ्याच व्यक्तीच्या मालकाची आहे, मात्र अनिल कुमार नावाची व्यक्ती ती गाडी चालवत होता. तिच्यासोबत गाडीत आणखी काही मुले देखील होती. माहितीच्या आधारे, मुखर्जीनगर पोलीस ठाण्यात एफआरआय क्रमांक 390/26 नोंदवण्यात आला. भारतीय संहिता कलम 78,79 आणि 3 (5) अंतर्गत नोंदवण्यात आला. 

हे ही वाचा : ज्ञानेश कुमार यांनी मोदींच्या घरात चपरासी म्हणून राहावं - अभिजीत दीपके

दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की, आरोपींना बांधून ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू ठेवण्यात आला आहे. या घटनेनं दिल्लीतील महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.