मुलांना सोडून पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचा आरोप, रागाने नवऱ्याचे गुप्तांग कापले?

मुंबई तक

Crime News : तीन महिन्यापूर्वी महिला तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली आणि नंतर ती पुन्हा घरी परतली. नंतर तिचा आणि तिच्या नवऱ्याचा वाद झाला होता. पत्नीच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याने तिचे नाक चावले.  नाकाला चावल्याने महिलेनं आरडाओरड केली होती. पत्नीने बदला म्हणून प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बायको तीन महिन्यांपासून परपुरूषासोबत पळून गेल्याचा आरोप 

point

गुप्तांगावर हल्ला करत कापल्याचा आरोप 

Crime News : उत्तर प्रदेशच्या हरदोई येथून खळबळजनक घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. तीन महिन्यापूर्वी महिला तीन मुलांना सोडून प्रियकरासोबत पळून गेली आणि नंतर ती पुन्हा घरी परतली. नंतर तिचा आणि तिच्या नवऱ्याचा वाद झाला होता. पत्नीच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याने तिचे नाक चावले.  नाकाला चावल्याने महिलेनं आरडाओरड केली होती. पत्नीने बदला म्हणून प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला. त्यानंतर नवऱ्याच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. यानंतर सासूने आपल्या सूनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमी जोडप्याला रुग्णालयात दाखल केले होते. 

हे ही वाचा : शिरुरमध्ये रक्तरंजित खेळ, पहाटे झालेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू

बायको तीन महिन्यांपासून परपुरूषासोबत पळून गेल्याचा आरोप 

ही घटना हरदोईच्या सांडी शहरातील मुन्शीगंज येथील आहे. एका तरुणाचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तरुणाच्या आणि त्याच्या आईच्या आरोपानुसार सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्याची पत्नी प्रेमप्रकरणाने शेजारच्या नौशेरा परिसरातील एका तरुणासोबत पळून गेली होती. पतीने त्या दोघांवर कोर्ट मॅरेज केल्याचा आरोप केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस ठाण्यात पंचायत घेण्यात आली होती. या प्रकरणात धाकट्या मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आल्याचा करार झाला होता. यानंतर ती मुलगी दिल्लीला निघून गेल्याची माहिती समोर आली. 

गुप्तांगावर हल्ला करत कापल्याचा आरोप 

तीन महिने प्रियकरासोबत राहिलेली महिला पुन्हा घरी परतली असता, तिचे कुटुंबीयांसोबत खटके उडू लागले होते. दोघांमधील वाद इतका वाढला की, नवऱ्याने पत्नीचे नाक चावले, याचाच वचपा काढण्यासाठी पत्नीने नवऱ्याचे गुप्तांग कापल्याची घटना आहे. आईच्या म्हणण्यांनुसार, सुनेनं लेकाच्या  गुप्तांगावर हल्ला करत कापल्याचा आरोप केला, ज्यामुळे रक्तस्त्राव झाला. घरगुती वादाची माहिती समजताच, पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले होते. 

हे ही वाचा : मस्करीत चेहऱ्याला लावला केक, सपासप वार करत तरुणाला संपवलं

अशातच पोलिसांनी माहिती दिली की, पतीच्या वैद्यकीय तपासणीत कोणतीही जखम आढळून आलेली नाही. शांतता भंग केल्याप्रकरणी त्या तरुणावर कारवाई करण्यात आली आहे.