'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंची सडकून टीका, विरोधकांना आंदोलनाची हाक!

मुंबई तक

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्यानेश कुमार आणि भाजपवर त्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.

ADVERTISEMENT

Raj Thackeray
Raj Thackeray
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!

point

राज ठाकरेंची सडकून टीका

point

विरोधकांना आंदोलनाची हाक!

Raj Thackeray : भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षांकडून ग्यानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तसेच काल कॉक्रोच जनता पार्टीनेदेखील कुमारांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर राजीनामा दिला नाही तर पुन्हा एकदा आंदोलन उभं करण्याचा इशारा सीजेपीने दिला आहे.

अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्यानेश कुमार आणि भाजपवर त्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. या पोस्टमध्ये ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे, जाणून घेऊया.

राज ठाकरे  यांची पोस्ट जशीच्या तशी

ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो.

गेले 2 दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी 2025 पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे.