दोन मुली एकमेकींच्या प्रेमात आकंठ बुडाल्या, कुटुंबियांना समजताच घडलं भयंकर

मुंबई तक

कोटा येथे दोन मुलींचे प्रेमप्रकरण उघडकीस आले आहे. त्या नात्यातील असून सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली होती. कुटुंबीयांच्या विरोधानंतर त्यांना समुपदेशनासाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले, जिथे त्यांनी एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची इच्छा व्यक्त केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दोन मुली एकमेकींच्या प्रेमात आकंठ बुडाल्या

point

कुटुंबियांना समजताच घडलं भयंकर

Crime News : राजस्थानमधील कोटा शहरात नातेवाईक असलेल्या दोन सज्ञान तरुणींच्या प्रेमाची आणि संघर्षाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे तीन वर्षांपूर्वी या दोन तरुणींची मैत्री झाली होती. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या या नात्याला कुटुंबीयांचा विरोध होता. अखेर या विरोधाला कंटाळून सुमारे पाच महिन्यांपूर्वी दोन्ही तरुणींनी घर सोडले आणि सवाई माधोपूर येथे भाड्याची खोली घेऊन एकत्र राहू लागल्या व तेथेच काम करू लागल्या.

'आम्ही आयुष्यभर एकत्र  राहणार'

दरम्यान, कुटुंबीयांनी दोन्ही तरुणींची शोधाशोध सुरू केली होती आणि पोलिसांत त्यांच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना परत बोलावले. मंगळवारी (22 सप्टेंबर) बोरखेडा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या लोकांना चर्चेसाठी आणि समुपदेशनासाठी एकत्र आणण्यात आले. परंतु, पोलीस आणि नातेवाइकांसमोर दोन्ही तरुणींनी आपले मत ठामपणे मांडले. आपण एकमेकांवर प्रेम करतो आणि आयुष्यभर एकत्रच राहणार असल्याचे सांगत त्यांनी विभक्त होण्यास स्पष्ट नकार दिला.

हे ही वाचा : अशोक चव्हाण ते मिलिंद देवरा.., दिग्गजांना जाऊ दिलं, मग बोंद्रेंना का रोखलं? Inside स्टोरी

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्या अन्...

दोन्ही तरुणी सज्ञान असल्याने पोलिसांनी त्यांचे रीतसर कायदेशीर जबाब नोंदवून घेतले आणि त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जाण्याची परवानगी दिली. परंतु, पोलीस ठाण्यात येण्यापूर्वीच या दोन्ही तरुणींनी कीटनाशक प्राशन केले होते. सुरुवातीला याचा कोणताही त्रास जाणवला नाही, मात्र पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती खालावू लागली. त्यांची बिकट अवस्था पाहून त्यांना तातडीने कोटा येथील एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : 'सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायंत!' राज ठाकरेंची सडकून टीका, विरोधकांना आंदोलनाची हाक!

दोन्ही तरुणी निर्णयावर ठाम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही तरुणींचे शिक्षण सुमारे आठवीपर्यंत झाले आहे. विषप्राशन केलेले असूनही, रुग्णालयात उपचारादरम्यान दोन्ही तरुणी आपल्या निर्णयावर ठाम असून एकत्र राहण्याचाच पुनरुच्चार करत आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून असून पोलीस कुटुंबीय आणि तरुणींच्या जबाबाच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.